Crime esakal
मुंबई

Mumbai Terror Attack : दहशतवादी हल्ल्याचा मुंबई पोलिसांना फोनकॉल करणारा आरोपी अटकेत

शुक्रवारी रात्री दहशतवादी पाकिस्तानातून आले असून काही तासांत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शुक्रवारी रात्री दहशतवादी पाकिस्तानातून आले असून काही तासांत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला होता. याप्रकरणी नागेंद्र ज्ञानेंद्र शुक्ला या 30 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून वनराई पोलिसांनी दिंडोशी येथून संबंधित आरोपीला अटक केली आहे.आरोपीने मद्याच्या नशेत धमकी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

घटनाक्रम

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आरोपीने शुक्रवारी रात्री उशीरा फोन कॉल केला होता. या व्यक्तीने पोलिसांना कॉल करत बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली होती. त्याने फोनवर पाकिस्तानमधून आलो आहोत सांभाळून रहा. मुंबईत काही तासात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी कॉलरने दिली होती. त्याने कॉल दरम्यान सीमा हैदरचा देखील उल्लेख केला होता. आरोपीने मद्याच्या नशेत धमकी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अफवांच्या बाजारात उधाण

मुंबई पोलिसांना यावर्षी 9 महिन्यात 80 हून अधिक खोटी माहिती देणारे अथवा अफवा/धमकीचे कॉल आले आहेत.तसेच ग्रँट रोड भागातील एका महिलेने 38 वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता. गेल्या आठवड्यात मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी 112 क्रमांकाच्या हेल्पलाईनला आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली.

निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची इच्छा केली व्यक्त केली. त्यांच्याशी बोलू दिले नाही तर बॅाम्बने मंत्रालय उडवून देण्याची दिली धमकी दिली. त्यानंतर पाथर्डी येथून एका संशयीताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच दक्षिण मुंबईतील एका महिलेने 38 वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता.अशा घटनांमुळे पोलीस यंत्रणांवरील ताण वाढतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT