टकटक गँगची दहशत 
मुंबई

गॅँग्ज ऑफ मुंबई : टकटक गॅंगची दहशत

अनिश पाटील


मुंबई : संगीत दिग्दर्शक डब्बू मलिक वर्सोव्यात राहतात. काही दिवसांपूर्वी ते रात्री ८.३० च्या सुमारास जुहूतारा रोडवरून सांताक्रूझला मर्सिडीज कारने चालले होते. रस्त्यात एका सिग्नलला त्यांची गाडी थांबली. अचानक एका व्यक्तीने गाडीच्या काचेवर टकटक केले. त्यांनी काच खाली केली. त्या व्यक्तीने त्यांना बोलण्यात गुंतवले, तेवढ्यात दुसऱ्या बाजूने एकाने त्यांच्या कारमधील मोबाईल आणि अन्य काही मौल्यवान सामान लंपास केले. मलिक यांना त्याचा पत्ता लागला, तेव्हा बराच उशीर झाला होता. सध्या या अशा टकटक गॅंगची मोठी दहशत आहे मुंबईत. सामान्यांपासून सेलेब्रिटींपर्यंत अनेकांना त्यांनी अशा पद्धतीने लुटले आहे.

गुन्ह्याची ठिकाणे
प्रामुख्याने रस्त्यांवरील सिग्नल, रेल्वे, बस, धार्मिक स्थळे.

गॅंगची कार्यपद्धत 

नागरिकांचे लक्ष विचलित करून लुटणे, ही या टोळीची मोडस ऑपरेंडी. कधी ते कारच्या काचेवर टकटक करून खाली पैसे पडल्याचे सांगून लुबाडतात; तर कधी अंगावर घाण पडल्याचे सांगून लुटतात. पूर्वी या टोळीतील लोक ग्लुकोज बिस्कीट चघळून त्याची पिचकारी गुपचूप त्यांच्या शिकारीच्या पाठीवर मारायचे. मग दुसरा ते दाखवायचा. बाजूलाच नळ आहे तेथे जाऊन ते साफ करू या असे सांगायचा. ती व्यक्ती ती घाण साफ करू लागली, की तिसरा चोरटा येऊन त्या व्यक्तीचा खिसा साफ करायचा वा बॅग पळवायचा. हल्ली ते तुमचे पैसे पडले आहेत, असे सांगत कार्यभाग साधतात. काही जण खाजकुयली टाकून लक्ष विचलित करतात. कारवर टकटक करून काच खाली करायला लावायच्या त्यांच्या पद्धतीमुळे अशा टोळ्यांना टकटक गॅंग असे नाव पडले. चोरीसाठी या टोळ्या विशेष करून अल्पवयीन मुलांचा वापर करतात.

सांकेतिक भाषा
काही टकटक टोळ्यांतील चोरटे सांकेतिक भाषेचा वापर करतात. म्होरक्‍याच्या हाताखाली काम करणाऱ्याला त्यात पंटर किंवा डाव म्हटले जाते. टोळीला ‘कंपनी’ असे संबोधले जाते. कंपनीचा म्होरक्‍या हा ‘भाई’ असतो. मुख्य चोरट्याला ‘मशीन’ आणि मोबाईलला ‘कौआ’ म्हणतात. एकमेकांना ते कधीही खऱ्या नावाने हाक मारत नाहीत.

अशी घ्या काळजी...

तुमचे पैसे पडले आहेत, अंगावर घाण पडली आहे, असे कोणी सांगितले तर विचलित होऊ नका, गांगरून जाऊ नका. प्रथम आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. त्यावर लक्ष ठेवा. कारच्या काचेवर कोणी टकटक केल्यास संपूर्ण काच खाली करू नका. पलीकडच्या खिडक्‍यांची काच तर मुळीच खाली करू नका.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

LPG Gas Cylinder E-KYC: गॅस सिलिंडरची e-KYC केली का? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम; जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप माहिती

Nilanga Drought Crisis : आता जगायचं कसं ? मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो, CM फडणवीसांनी केलं असं काही..

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT