Chabad House 
मुंबई

Chabad House: NIA ने पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्याकडे छाबड हाऊसचा फोटो, यंत्रणा अलर्ट मोडवर...

Sandip Kapde

Chabad House: मुंबईतील कुलाब्यामधील छाबड हाऊसची सुरक्षा वाढवली आहे. पुण्यातून एनआयएने अटक केलेल्या दहशतवाद्याकडे छाब हाऊसचा फोटो सापडला आहे. त्यामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

छाबड हाऊसवर दहशतवादी हल्ला झाला होता. पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर कुलाब्यातील छाबड हाऊस असल्याची चर्चा आहे. दरम्यान दहशतवादी पथक छाबड हाऊसमोर दाखल झाले आहे.

पुण्यातून इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी यांच्याकडून छबाड हाऊसचे फोटो सापडल्यानंतर तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (latest marathi news)

गुरवारी येथे मॉक ड्रिल देखील घेण्यात आली होती. पुण्याच्या कोंढवा येथून १९ जुलैला दोघा संशयितांना पकडण्यात आले होते. तपासात हे दोघे एनआयएच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये होते.

पुणे पोलिसांनी या दोघांकडून जिवंत काडतुसासह ड्रोन बनवण्याच सामान जप्त केले होते. सध्या या दोघांचा ताबा एटीएसने घेतला आहे.

मूळचे मध्य प्रदेशच्या रतलामचे असलेले हे दोघे सुफा नावाच्या मध्य प्रदेश येथील दहशतवादी संघटनेशी संलग्न असल्याचा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे.

हे दोघे इसिसकडून प्रेरित असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. जयपूर येथे स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्याचा आरोप  देखील त्यांच्यावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT