मुंबई

अकरावीच्या विद्यार्थांची कसोटी! ऑनलाइन शिक्षणाबाबत महाविद्यालयांना अद्याप सूचनाच नाहीत

तेजस वाघमारे


मुंबई  : नवीन कोरोना विषाणूच्या भितीमुळे पुन्हा महिनाभर मुंबईतील शाळा, महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता लांबणीवर पडली आहे. याचा सर्वाधिक फटका अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ऑनलाइन शिक्षण आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत शिक्षण विभागाने महाविद्यालयांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. यातच पुढील दोन महिन्यात विद्यार्थ्यांना अकरावीच्या परीक्षांना सामोरे जावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मुंबई महानगत प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी यंदा 3 लाख 20 हजार 930 जागा उपलब्ध होत्या. प्रवेशाच्या तीन नियमित आणि एका विशेष फेरीनंतर 1 लाख 35 हजार 430 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. विशेष फेरी 1 नंतर 8 हजार 856 विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतरही शिक्षण विभागाने अद्यापपर्यंत ऑनलाइन शिक्षणाविषयी शालेय शिक्षण विभागाने कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या तरी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून या विद्यार्थ्यांना आता लवकरच परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. तसेच आयुष्याला कलाटणी देणारा बारावी परीक्षेचा अभ्यास कसा करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तसेच अकरावीचा अभ्यासक्रम कमी करण्यासोबत परीक्षा कधी आणि कशी आयोजित करायची याबाबत शिक्षण विभाग विचार करत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Test for 11th graders Colleges have not yet been notified about online education

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shabbir Ahmed: मोठा दहशतवादी कट उघड! ३ मंदिरांची पाहणी; व्हिडिओ शूट करून पाकिस्तानला पाठवले, शब्बीर लोनचे धक्कादायक खुलासे

Vande Bharat: ‘वंदे भारत’च्या डब्यांची संख्या वाढणार! 'या' रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल, प्रशासनाचा निर्णय; वाचा सविस्तर

Electric Shock: शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना, उसाला पाणी देताना दुघर्टना, कुटुंबीयांचा आक्राेश!

Leopard Skin Smuggling : साताऱ्यापासून लातूरपर्यंत पसरलंय तस्करीचं जाळं; कोल्हापूर महामार्गावर बिबट्याची दोन कातडी जप्त, मोठी टोळी गजाआड

Satara News: सातारकरांचाही परदेशी ओढा! जिल्ह्यात आंतरराष्‍ट्रीय वाहन परवाना मागणीत वाढ; प्रादेशिक कार्यालयातून तब्‍बल १३३ जणांची प्रक्रिया..

SCROLL FOR NEXT