Testing of car parking lifts elevator collapse 4 workers injured mumbai sakal
मुंबई

कार पार्किंग लिफ्टची टेस्टिंग ; गाडीसह लिफ्ट कोसळल्याने 4 कामगार जखमी

तिघांची परिस्थिती गंभीर, कल्याण मधील घटना

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कार पार्किंग लिफ्टची टेस्टिंग सुरू असतानाच दुर्घटना घडून गाडीसह लिफ्ट खाली कोसळल्याची घटना कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरात घडली. या दुर्घटनेत 3 कामगार गंभीर जखमी, तर 1 जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण पश्चिम अहिल्याबाई चौकात पुण्य द स्काय लॉन्च ही 23 मजली इमारत आहे. या इमारतीत चार मजली पार्किंग उभारण्यात आले आहे.

या पार्किंग मधील लिफ्टची सोमवारी सायंकाळी टेस्टिंग सुरू होती. तळ मजल्यावरून गाडी लिफ्ट मध्ये चढवून लिफ्ट वर जात असतानाच अचानक काही बिघाड झाल्याने लिफ्ट खाली कोसळली. यावेळी काम करत असलेले 4 कामगार जखमी झाले. लिफ्ट कोसळल्यानंतर जोरदार आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी धाव घेत कामगारांना बाहेर काढत त्यांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस व अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. हा अपघात कसा घडला याविषयी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गिरणी कामगारांना हक्काचे घरं नाहीचं, सरकारकडून पुन्हा मुंबईतील घरांचे गाजर

Mini Maldives: लाखोंचा खर्च कशाला? भारतात दडलाय 'मिनी मालदीव'; हे निसर्गरम्य ठिकाण पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

कागदपत्र देण्याच्या बहाण्याने स्पर्श अन् जवळीक! महिला पोलिसाचा विनयभंग, ASIवर गुन्हा दाखल

शरियाचा फायदा घेत मुस्लिमांना ३ हजार कोटींना फसवलं; नौहेरा शेखनं काय केलं? EDने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : TCS प्रकरणात मतीन पटेल यांना नोटिस

SCROLL FOR NEXT