Varun Sardesai sakal
मुंबई

Varun Sardesai : पुन्हा येथे हेच खासदार आले, तर अशीच गुंडागर्दी वाढेल

ठाकरे गटाचे युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी डागली खासदार शिंदे यांच्याबर तोफ

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण लोकसभा हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनेने येथे नवखा उमेदवार दिला होता, त्यांचा येथे काडीमात्र संबंध नसताना शिवसैनिकांनी मेहनत घेतली आणि आणि जनतेने त्यांना निवडुन दिले. परत एकदा हेच खासदार येथे निवडून आले, तर गुंडागर्दी अशाच प्रकारे वाढत राहील हे जनतेला आता कळलेल आहे. असे म्हणत युवासेना सचिव वरून सर्देसाई यांनी अप्रत्यक्षरीत्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर तोफ डागली आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे हे कल्याण कोळसेवाडी शाखेला भेट देण्यासाठी येत आहेत. यावेळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार डॉ. शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

सरदेसाई म्हणाले, कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. जेव्हा ठाणे लोकसभा मतदारसंघ होता तेव्हा देखील कल्याण डोंबिवली येथील जनतेने शिवसेनेला मतदान केलेले आहे. गेल्यावेळी देखील येथे नवखा उमेदवार देऊन सुद्धा, या उमेदवाराचा या मतदार संघात काडीमात्र संबंध नसताना देखील शिवसैनिकांनी मेहनत घेतली आणि कल्याण डोंबिवलीकर जनतेने त्यांना निवडून दिले.

त्यामुळे यावेळी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या मागे शंभर टक्के कल्याण डोंबिवलीची जनता उभी राहील असं मला ठाम विश्वास आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच येथील उमेदवार कोण असेल याची घोषणा करतील.

पण असं वाटतं परत एकदा हेच खासदार निवडून आले तर गुंडागर्दी अशाच प्रकारे येथे वाढत राहील हे जनतेला आता कळलेल आहे. म्हणून जनतेची देखील तेवढीच जबाबदारी आहे की कुठेतरी सरकार बदललं पाहिजे व येथील लोकप्रतिनिधी देखील स्वच्छ प्रतिमेचा असला पाहिजे असे सांगितले.

आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत. वरळी मतदारसंघात त्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम सुरू आहे. त्यामुळे कोणत्या व्यक्तीच्या विरोधात असण्यापेक्षा जी गुंडागर्दी आहे ती संपवण्याकरिता. ही जी काही गद्दारीची वृत्ती आहे. ती संपवण्याकरिता एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आमच्या पक्षाकडून दिला जाईल. आणि त्या उमेदवाराच्या पाठी येथील जनता उभी राहील ही हा ठाम विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT