Prakash Ambedkar 
मुंबई

Prakash Ambedkar: ठाकरे-शिंदेंचा समझोता झालाय, लोकसभा झाल्या की दोघे एकत्र येतील; आंबेडकरांच्या दाव्यामुळे खळबळ

आंबेडकर हे कल्याण लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी उल्हासनगर मध्ये आले होते

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर - उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे सोबत समझोता झालेला असून लोकसभा निवडणूक नंतर हे दोघे एकत्र आले तर आश्चर्य मानू नका..चर्चा चालू झाली आहे, असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगर मध्ये जाहीर सभेत केला आहे. आंबेडकर हे कल्याण लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी उल्हासनगर मध्ये आले होते, यावेळी त्यांनी आरोप केला.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर...

आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले की कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार हा खरंच लढणारा आहे, का नुरा कुस्तीचा.. चर्चा हीच आहे, की ही नुरा कुस्ती आहे.. एकनाथ शिंदे सोबत समझोता करून झालेला असून लोकसभा निवडणूक नंतर हे दोघे एकत्र आले तर आश्चर्य मानू नका चर्चा चालू झाली आहे असा, आरोप आरोप प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर केला आहे.

आंबेडकर पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत करणार त्यामुळे हे फसवा फसवीचे राजकारण सुरू आहे असं आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT