Shiv Sena Symbol EC Hearing Shiv Sena Symbol Hearing Shivsena Symbol Crisis Thackeray VS Shinde Shiv Sena Symbol News Shiv Sena Symbol Row Shiv Sena Symbol Election Commission Hearing esakal
मुंबई

Thackeray vs Shinde : निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का; मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा थेट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

सकाळ डिजिटल टीम

Thackeray vs Shinde : बोरिवलीत शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत . विभाग क्रमांक एक बोरिवली येथील उद्धव ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नुकताच प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

विभागातील प्रमुख नेते दामोदर म्हात्रे, सचिन म्हात्रे, उपविभागप्रमुख सुनील पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पदनियुक्ती सोहळ्याचे आयोजन शिंपोली येथे करण्यात आले.

याप्रसंगी विभागप्रमुख आमदार प्रकाश, दामोदर म्हात्रे यांनी या सर्वांचे स्वागत केले. त्यांच्यावर कसा अन्याय झाला हे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार कसे डावले गेले याचा कार्यकर्त्यांसमोर पाढाच वाचला.

आपण कंटाळून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहज भेटणारे तसेच बाळासाहेबांच्या विचारांच्या, धनुष्यबाण जनकल्याण आणि जनविकास यांचा ध्यास असलेल्या पक्षात आलो आहोत असे प्रवेश केलेले शिवसैनिक यावेळी म्हणाले.

सर्वांना वाव दिला जाईल, महिला युवकांच्या हाताला रोजगार दिला जाईल, शासन आपल्या दारी ही संकल्पना , घेऊन चालणारे हे सरकार आणि मुख्यमंत्री आहेत. यातून जनविकास नक्कीच साधला जाईल, असा विश्वासही प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT