File photo  
मुंबई

भिवंडीमधुन १२ हजार जिलेटिन कांड्या आणि ३ हजार डिटोनेटर्स जप्त

गुन्हे शाखेची मोठी कारवाई

दीनानाथ परब

ठाणे: भिवंडीमधुन मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. यात जिलेटिनच्या कांड्या (gelatin sticks) आणि डिटोनेटर्सचा (detonators seized) समावेश आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट एक ने ही कारवाई केली. कारवाईमध्ये पोलिसांनी १२ हजार जिलेटिन कांड्या आणि ३ हजारपेक्षा जास्त डिटोनेटर्स जप्त केले आहेत. (12,000 gelatin sticks 3,000 detonators seized from Bhiwandi)

या जिलेटिन कांड्या ६० बॉक्समध्ये पॅक केलेल्या होत्या. प्रत्येक बॉक्समध्ये १९० कांड्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. कारीवाली गावात मित्तल एन्टरप्रायजेसमध्ये स्फोटकांचा मोठा साठा साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. ही धाड टाकण्यासाठी पोलिसांनी एक टीम बनवली.

ठाणे पोलिसांनी या प्रकरणात गुरुनाथ काशिनाथ म्हात्रे (५३) याला अटक केली आहे. "आरोपी इमारती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करतो आणि पेशाने खाण कंत्राटदार आहे. भिवंडी कालवर भागात आरोपी राहतो. त्याने दोन खोल्यांमध्ये स्फोटके ठेवली होती. कारीवाली गावातील महेश स्टोन चाळ येथे रुम्स आहेत" असे गुन्हे शाखेचे डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असून त्याला २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जप्त केलेली स्फोटते वाडा येथे ठेवल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT