coronavirus thane 
मुंबई

चिंताजनक ! ठाण्यात 24 तास 32 नवे कोरोनाबाधित, जाणून घ्या एकूण रुग्णसंख्या

सकाळवृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीचा आलेख चढाच असून मंगळवारी (ता.21) एका दिवसात जिल्ह्यात 32 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच दोन जणांचा मृत्यू देखील झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीतांचा आकडा 453 वर पोहोचला असून 17 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

मंगळवारी ठाणे पालिकेच्या हद्दीत 5 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. तर,  दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 152 वर पोहोचली असून आतापर्यंत 6 मृत्यूंची नोंद झाली आहे. मिरा-भाईंदरमध्ये 12 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून तेथील बाधितांचा आकडा 106 वर पोहोचला आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीत 7 रुग्णांची नोंद करण्यात आली असून रुग्णांची संख्या 85 झाली आहे. तर,  नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 6 नव्या रुग्णाची नोंद झाली असून तेथील रुग्णांची संख्या 75 झाली आहे. तसेच भिवंडीत 2 नव्या रुग्णांमुळे रुग्णांची संख्या 5 झाली आहे.

शहरी भागात संकट गडद
जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या पाहता ठाणे व मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधीतांच्या आकडेवारीने शंभरी पार केली आहे. त्यामुळे शहरी भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे.

 In Thane 24 hours 32 new corona and total number of patients

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT