Rape sakal
मुंबई

ठाण्यात विद्यार्थीनीवर बलात्कार; क्रीडा प्रशिक्षकाला बेड्या

प्रशिक्षक आणि सदर फिर्यादी विद्यार्थीनी २०१४ पासून एकमेकांना ओळखतात.

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : आपल्याच क्रीडा विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका ३१ वर्षीय क्रीडा प्रशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना मुंबईतील डोंबिवलीत घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(Thane 31 Year Old Coach Held for Raping Student)

सदर प्रकरणाची माहिती देताना मानपाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्रशिक्षक आणि सदर फिर्यादी विद्यार्थीनी २०१४ पासून एकमेकांना ओळखतात. मुलगी आरोपीकडे क्रीडा प्रशिक्षण घेत होती. त्यांची जुनी ओळख असल्याने आरोपीने तीला लग्नाचे आमिष दाखवून तीच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

त्यानंतर मुलीने आरोपीला जाब विचारल्यावर याप्रकरणी कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. नाहीतर बलात्कार केल्यानंतर पीडितेचे आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने मुलीला दिली होती. त्यानंतर मुलीने रविवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सदर ३१ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : लातूरच्या खाजगी शाळांमध्ये पालकांची लूट

Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!

SCROLL FOR NEXT