मुंबई

ठाणे शहरात दिवसाला 60 जणांना श्‍वानदंश

सकाळवृत्तसेवा

ठाणे : महापालिकेकडून भटक्‍या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण केले जाते; पण पाच वर्षांहून अधिक काळ ही प्रक्रिया सुरू असूनही शहरातील भटक्‍या कुत्र्यांची संख्या लाखाच्या घरात पोचल्याने निर्बीजीकरणाबाबत शंका निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, दिवसाला सरासरी 60 जणांना भटका कुत्रा चावण्याच्या घटना घडत आहेत. 

उल्हासनगरमध्ये कुत्र्याने सात मुलांना चावा घेतल्यानंतर भटक्‍या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत; मात्र पालिका रुग्णालयात उपचार घेतले तरच पालिकेकडे याची नोंद होते. या नोंदीनुसार दिवसाला केवळ पाच जणांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्याचा दावा केला जात आहे; पण प्रत्यक्षात हा आकडा 60 आहे, असा दावा या विषयावर पाठपुरावा करणारे दक्ष नागरिक सत्यजित शहा यांनी केला आहे. ठाण्यातील महागिरी कोळीवाड्यातील भारती कुटुंबीयांनी तर भटक्‍या कुत्र्यांचा धसकाच घेतला आहे. गेल्या महिन्यात कुत्र्याने याच कुटुंबातील आर्यन (वय 10) याच्या पाठीचा चावा घेतला. तेव्हापासून आर्यनच्या मनात कुत्र्यांची भीती कायम आहे, असे शहा यांनी सांगितले. भटक्‍या कुत्र्यांचे लहान मुलांवरील हल्ले वाढले आहेत. श्‍वानदंशाच्या घटनांपैकी 80 टक्के घटनांमध्ये तीन ते आठ वर्षांच्या बालकांचा समावेश असल्याचे शहा यांनी सांगितले. 

एक लाख भटकी कुत्री 

ठाणे शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या सुमारे एक लाखापर्यंत असावी, असा अंदाज शहा यांनी वर्तवला आहे. कारण महापालिकेच्या दाव्यानुसार अद्याप शहरात 40 हजार भटकी कुत्री आहेत; मात्र त्याच वेळी दीड वर्षापासून कुत्र्यांचे सर्वेक्षण झालेले नसल्याने भटक्‍या कुत्र्यांची निश्‍चित संख्या सांगणे पालिका प्रशासनाला शक्‍य झालेले नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT