bird flu alert Sakal
मुंबई

Bird Flue: ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव

२३ हजारांहून अधिक कोंबड्या नष्ट, पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून राज्यभरात सतर्कता बाळगण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ठाणे जिल्ह्यातील वेहलोळी गावात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असून, त्या ठिकाणापासून एक किलोमीटर त्रिज्येच्या अंतरामधील सर्व कोंबड्या नष्ट करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. बाधित क्षेत्रामधून पथकाच्या देखरेखीखाली आतापर्यंत २३ हजार ४२८ कोंबड्या, एक हजार ६०३ अंडी, तीन हजार ८०० किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्षेत्रीय यंत्रणांना सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. (Bird Flue Infection In Thane)

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तीनशे कोंबड्या आणि ९ बदकांमध्ये मरतूक आढळून आली. त्यामुळे पशुसंवर्धन आयुक्तालयाने त्याचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेला १४ फेब्रुवारी रोजी पाठविले होते. त्यांचे तपासणी निष्कर्ष प्राप्त झाले असून, त्याठिकाणी एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच१एन१) पॉझिटिव्ह आल्याचे केंद्र सरकारने १७ फेब्रुवारीला अधिकृत कळविले आहे.

शहापूर येथील पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करून निर्जंतुकीकरण करण्यासाठी पशुरोग अन्वेषण विभागाचे पथक पाठविण्यात आले आहे. या अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी यांनी वेहलोळी (ता. शहापूर, जि. ठाणे) गाव संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन आयुक्तालयाने सर्व जिल्ह्यांमधील यंत्रणांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित पक्षी किंवा पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मरतूक झाल्याचे निदर्शनास आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

शिजवलेले कुक्कुट मांस खाणे सुरक्षित

कुक्कुट मांस किंवा अंडी ७० अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रिय होतात. त्यामुळे शिजवलेले मांस आणि अंडी खाणे पूर्णत: सुरक्षित आहे. तसेच, बर्ड फ्लूबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज आणि अफवा पसरविण्यात येउ नये, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

मृत पक्षांना हात लावू नका

शवविच्छेदन किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये.

पोल्ट्री फार्म मालक किंवा नागरिकांनी ग्रामपंचायतीला माहिती द्यावी

ग्रामसेवकांनी पशुवैद्यकाला लेखी स्वरूपात माहिती कळविणे बंधनकारक

या क्रमांकावर संपर्क साधा

टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८

कॉल सेंटर क्रमांक १९६२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT