NCC Student Sakal
मुंबई

ठाण्यातील धक्कादायक घटना! NCC च्या विद्यार्थ्यांना काठीने बेदम मारहाण; Video होतोय Viral

ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेनंतर विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे NCC चे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. याच दरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. मात्र ही शिक्षा अशा अमानवी प्रकारची असल्याचं समोर आल्याने खळबळ माजली आहे.

यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसी बाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसी नकोच असे म्हणताना दिसत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचं जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी खडसावून सांगितलं आहे.

"एनसीसीचे हेड असतात ते सिनियर विद्यार्थीच असतात. ते कोणी शिक्षक नसतात, मात्र हा अत्यंत घृणास्पद प्रकार झाला आहे. याने NCCच्या मार्फत जी चांगली काम होतात ती झाकोळली गेली आहेत. शिक्षक नसताना झालेला हा प्रकार असून त्या विद्यार्थ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे." असं प्राचार्यांनी सांगितलं.

"हे असले प्रकार यापुढे होऊन नयेत म्हणून एक कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करत आहोत. ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये, आम्हाला येऊन भेटावे, एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये." असे जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT