corona hospital
corona hospital sakal media
मुंबई

ठाण्यातील कोव्हिड रुग्णालये पडली ओस; केवळ ९५ रुग्ण उपचारासाठी दाखल

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कोरोना काळात (corona pandemic) हजारो रुग्णांना (corona patients) मोफत उपचार देत वरदान ठरलेले ठाणे महापालिकेचे (thane municipal corporation) ग्लोबल कोविड रुग्णालयात (Global corona hospital) रुग्णांअभावी ओस पडू लागले आहे. सध्या या कोविड सेंटरमध्ये (corona center) एक हजारहून अधिक खाटा रिकाम्या (vacant beds) असून केवळ १९ रुग्ण उपचार घेत आहेत; तर पालिकेच्या पार्किंग प्लाझा रुग्णालयात (parking plaza hospital) फक्त सहा रुग्ण दाखल आहेत.

पालिकेसह खासगी कोविड रुग्णालयांमध्येही हीच परिस्थिती असून संपूर्ण ठाण्यामध्ये आजच्या घडीला ९५ कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पहिल्यांदाच शंभरच्या आत आल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर कोविडमुक्तीच्या दिशेने प्रकाशमान होणारा आशेचा दिवा मानला जात आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर यंदाची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होत आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे आलेल्या नैराश्याचा दीपोत्सवात नाश होऊन पुन्हा नव्याने आयुष्य तेजोमय व्हावे, अशीच प्रार्थना सर्वत्र केली जात आहे.

त्याअनुषंगाने दिलासा देणारी बाब समोर आली आहे. शहरामध्ये दैनंदिन रुग्णसंख्या ४० ते ५० च्या दरम्यान स्थिरावली असून सुमारे ४०० रुग्ण सक्रिय आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरच्या घरी उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी, रुग्णालयात सध्याच्या घडीला जोखमीव्यतरिक्त रुग्ण दाखल नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, कोरोना काळात एकेकाळी खच्चून भरलेल्या ग्लोबल रुग्णालयासह खासगी कोविड रुग्णालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. सुमारे चार हजार खाटांची क्षमता असलेल्या ठाण्यातील कोव्हिड रुग्णालयांमध्ये आजच्या घडीला अवघे ९५ रुण उपचार घेत आहेत.

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील एक हजारहून अधिक खाटा रिकाम्या आहेत. सध्या या रुग्णालयात १९ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये ११ जण आयसीयूमध्ये आहेत. अतिजोखमीचे दोन रुग्ण असून त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. ऑक्सिजनवर दोन; तर मध्यम जोखमीचे सात रुग्ण आहेत. समान्य वॉर्डात आठ रुग्ण उपचार घेत आहेत. पार्किंग प्लाझा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये अवघे सहा रुग्ण उपचार घेत आहेत. ठाणे पालिका क्षेत्रातील एकंदरीत रुग्णालयांचा आढावा घेतल्यानंतर एकूण दोन टक्केच खाटा भरल्याचे समोर आले आहे. संशयित रुग्णांसाठी उभारण्यात आलेला विलगीकरण कक्षही ओस पडला आहे. सुमारे ८९५ खाटांची व्यवस्था असलेल्या या कोव्हिड केअर सेंटरमध्ये सध्या येथे शून्य रुग्ण असल्याने त्याला टाळे ठोकण्यात आले आहे.

८४ रुग्ण जोखमीचे

कोव्हिड रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे बहुतेक रुग्ण हे जोखमीचे असल्याचे समोर आले आहे. सध्या ग्लोबलसह खासगी रुग्णालयांमध्ये ३७ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर; तर ३४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT