Crime sakal
मुंबई

Thane Crime: चाकूने वार करीत हत्येचा प्रयत्न करणाऱ्या 'त्या' दोघांना झाली अटक!

घरात घुसून चाकूने वार करून लोखंडी रोडने मारहाण करून हत्या करणायचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

जुन्या भांडणाचा राग मनात धरून ठाण्याच्या लोकमान्य नगरमध्ये फिर्यादी ऋतिक दिलीप दळवी(२३) याच्या घरात घुसून चाकूने वार करून लोखंडी रोडने मारहाण करून हत्या करणायचा प्रयत्न केला.

सदरची घटना गुरुवारी(ता-१५) रोजी ९-३० वाजण्याच्या सुमर्स घडला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपी अभिजीत भुपाल दास(३५) क्रिती भुपाल दास(३०) आणि इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्वरित दोघं आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

फिर्यादी ऋतिक दिलीप दळवी,(२३) रा.लोकमान्यनगर, ठाणे याचे आणि अटक आरोपी अभिजीत भुपाल दास, (३५) आणि क्रिती भुपाल दास(३०) दोघेही रा.लोकमान्यनगर, ठाणे पश्चिम येथे राहतात.

फिर्याईड आणि आरोपींमध्ये पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरीत गुरुवारी रात्री ९-३० वाजण्याच्या सुमारास आरोपी अभिजित आणि क्रिती या दोघं भावांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने संगनमत करीत चाकू आणि लोखंडी रॉड घेऊन फिर्यादी ऋतिक याच्या घरात घुसले आणि त्यांनी चाकूने दंडावर आणि पोटावर चार वार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर ऋतिकच्या आईला मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

जखमी ऋतिकला उपचारासाठी तात्काळ ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फिर्यादी ऋतिक दळवी याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलिसांनी दोघा आरोपी सह इतर आरोपीच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : ‘आम्ही मानवतेच्या दृष्टीने न्याय मागतोय’; ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT