Culprit arrested sakal media
मुंबई

बदलापूर : बांधकाम व्यावसायिकाकडून दहा लाखांची खंडणी घेणारे अटकेत

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : जीवे मारण्याची धमकी देत बदलापूर (badlapur) येथील बांधकाम व्यावसायिकाकडून (builder) खंडणी उकळणाऱ्या (extortion) दुकलीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या (thane cid) खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. कल्पेश जाधव (२६) आणि दीपक संदनशिव (३३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची (culprit arrested) नावे आहेत.

बदलापूर पूर्व भागातील प्रकाशकुमार जयस्वाल (३८) या बांधकाम व्यावसायिकाला २६ जून २०१९ ते १८ ऑक्टोबर २०२१ या काळात कल्पेश, दीपक, तसेच त्यांच्या इतर आणखी तीन ते चार साथीदारांनी आपसात संगनमत करून त्यांच्याकडून १० लाखांची खंडणी घेतली. जयस्वाल यांना रस्त्यात अडवून त्यांना, तसेच त्यांच्या परिवाराला ठार मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करीत त्यांच्याकडून काही रोकड, सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा दहा लाख ८९ हजारांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतले.

या बाबत बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात खंडणी उकळणे, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला. याची गांभीर्याने दखल घेत अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी हे प्रकरण खंडणीविरोधी पथकाकडे सोपविले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे आणि सुधाकर हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पी. एस. नाळे यांच्या पथकाने बुधवारी कल्पेश आणि दीपक या दोघांना बदलापुरातून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT