Mumbai Sakal
मुंबई

ठाणे जिल्हा रुग्णालय "Bronze" पुरस्काराने सन्मानित

जिल्हा रुग्णालयाने केलेल्या कामाची दखल घेत १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील (Thane) खासगी रुग्णालयांसह सरकारी रुग्णालयांनी (Hospital) महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवीत अनेक रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. त्यात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाने (Hospital) मागील दीड वर्षात एक हजार ११५ रुग्णांना या योजनेचा लाभ देत, जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात अव्वल स्थान मिळविले आहे. याची दखल घेत, जिल्हा सामान्य रुग्णालयाला ‘ब्रांझ’‘ (Bronze’) पुरस्काराने (Rewards) सन्मानित करण्यात आले आहे. ठाणे (Thane) जिल्ह्यात १० शासकीय रुग्णालये आहेत. त्यात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने महात्मा जोतिराव फुले (Mahatma Jotirao Phule) योजनेंतर्गत एक हजार ११५ रुग्णांना या योजनेचा लाभ देत, दिलासा देण्याचे काम केले.

जिल्हा रुग्णालयाने केलेल्या कामाची दखल घेत १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ब्रांझ पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. जिल्ह्यातील शासकीय कोविड रुग्णालयातील उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालय ३ येथे १३२, मध्यवर्ती रुग्णालय ४ येथे २४, प्रादेशिक मनोरुग्णालयात ३८, ग्रामीण रुग्णालय शहापूर येथे पाच; तर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात ६४३ रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : सर्फराज कभी धोका नही देता! भारताला हरवल्यानंतर पाकड्यांचे मानसिक संतुलन ढासळले, पाकिस्तानी मेंटॉरची मान पकडली अन्...

Lionel Messi India Tour : 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी लिओनेल मेस्सीला किती कोटी रुपये मिळाले? पोलिस तपासात आयोजकाचा खुलासा

सुरज चव्हाणने दिलेला शब्द मोडला; नव्या घराला नाही दिलं 'बिग बॉस'चं नाव; नव्या नेमप्लेटवर कुणाचं नाव?

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानी विजयी उमेदवारांचा सत्कार

शाहूपुरीची पंचवीस वर्षांची पाटीलकी संपुष्‍टात! नवख्‍या अक्षय जाधव यांना मतदारांची पसंती, राजकीय चक्रव्यूह भेदले..

SCROLL FOR NEXT