New Railway Track Sakal
मुंबई

श्रेय पंतप्रधान मोदींचेच, दुसरे कोणीही ते घेऊ नये - रावसाहेब दानवे

ठाणे ते दिवा दरम्यान रेल्वेच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून शुक्रवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या मार्गिकेचे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : ठाणे ते दिवा दरम्यान रेल्वेच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून शुक्रवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या मार्गिकेचे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. दरम्यान गेले अनेकवर्षे रखडलेल्या या कामासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करीत, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित देखील राहीले आहे. पाचव्या सहाव्या लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने या उद्घाटन सोहळ्याचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. (Mumbai New railway Track development)

तसेच दिव्यात रेल्वे स्टेशन परिसरात शिवसैनिकांनी स्वप्नपूर्ती लाखो प्रवाशांची या आशयाचे जोरदार बॅनर लावले आहेत. याचे श्रेय केवळ शिवसेनेला जाऊ नये म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी देखील बॅनर लावले. तसेच मुख्य कार्यक्रमाच्या आधीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाणे ते दिवा लोकल प्रवास करीत प्रवाशांची मने जिंकली. तसेच दिव्यात भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्र्यांचे जंगी स्वागत करीत छोटेखानी स्वागताचा कार्यक्रम करुन शक्तीप्रदर्शन केले. याला आता शिवसेना काय उत्तर देते हे पहावे लागेल.

मेल, एक्सप्रेससाठी ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान पाचवी - सहावी मार्गिका सुरु होत असल्याने लोकलचे वेळापत्रक आता सुधारणार आहे. लोकलच्या फेऱ्या वाढल्याने प्रवाशांचा प्रवास जलद होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे. शुक्रवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरुपात या मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याचे शिवसेनेच्यावतीने जंगी आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे. दिवा रेल्वे स्थानक परिसरातही या कार्यक्रमाची जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

दिवा येथे शिवसेनेचे नगरसेवक असून नुकतेच सेनेने भाजपाचे येथील पदाधिकारी देखील फोडले आहेत. त्यातच आता या कामाची शिवसेनेने जोरदार बॅनरबाजी करताच हे काम केंद्राचे देखील असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार माननारे बॅनर भाजपाने शिवसेना बॅनरच्या बाजूलाच लावल्याचे पहायला मिळाले. या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्त्रबुद्धे हे ठाणे येथे उपस्थित रहाणार आहेत. या मुख्य कार्यक्रमाआधीच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ठाणे ते दिवा लोकलने प्रवास करीत प्रवाशांची मने जिंकल्याचे पहायला मिळाले. दुपारी 12.30 च्या दरम्यान हे मंत्री दिवा रेल्वे स्थानकात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी बॅण्ड बाजासह जोरदार स्वागत केले.

मराठीतून संवाद साधत जिंकली मने....

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकलमधून उतरतानाच हात हलवून दाखवित कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. कार्यकर्त्यांच्या वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला असतानाच प्रवाशांनी देखील हात उंचावून वैष्णव यांचे स्वागत केल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर पाचव्या मार्गिकेच्या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमात मंत्री वैष्णव यांनी मराठीतून संवाद साधला. जय भवानी...जय शिवाजी अशा घोषणांनी त्यांनी भाषणाची सुरुवात केली. दिवा स्टेशनवर प्रवाशांना भेटून खूप आनंद झाला. पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छा घेऊन मी आज येथे आलो आहे. गेले अनेकवर्षे याची प्रतिक्षा प्रवाशांना होती...तो दिवस आज आला असून पंतप्रधान मोदी हे लवकरच ती पूर्ण करतील त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असे बोलून त्यांनी संवाद साधला.

श्रेय पंतप्रधान मोदी यांचेच - रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

2008 ला हे काम मंजुर झाले असले तरी मोदी सरकार आल्यानंतर त्यास गती मिळाली आहे. कोणीही एकट्याने हे श्रेय घेण्याचे काम नाही. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार, आमदार सर्वच प्रयत्न करीत होते. जर श्रेय कोणाला द्यायचेच असेल तर खरे श्रेय जाते ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. दुसरे कोणीही याचे श्रेय घेऊ नये असे उद्गार रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT