railway megablock sakal media
मुंबई

ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी लवकरच दोन ब्लॉक; वाचा सविस्तर

कुलदीप घायवट

मुंबई : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाणे-दिवा (Thane - Diva) पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचे (Fifth and sixth railway route) काम अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण नऊ किमीची ठाणे - दिवा पाचवी-सहावी मार्गिका तयार होत आहे. आता मार्गाची चाचणी होणार असल्याने इतर महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी डिसेंबर महिन्यात पुढील आठवड्यात १८ तासांचा पहिला मेगाब्लॉक (Railway mega block) घेण्याची शक्यता आहे. ब्लॉकमुळे लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मार्गावर १८ ते ७२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) द्वारे मार्गिकेचे काम सुरू आहे. प्रकल्प जानेवारी २०२२ च्या मध्यावर पूर्ण करण्याचा दावा एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे करण्यात आला आहे. त्यासाठी १८ तासांचा ब्लॉक घेऊन दोन्ही मार्गिकेचा पाहणी दौरा केला जाणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त अंतिम तपासणी करतील. त्यानंतर मार्गिका खुली केली जाईल.

चाचणीसाठी लोकल चालविण्याची योजना केली गेली आहे, अशी माहिती एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ब्लॉक घेण्यासंदर्भात मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसीचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत. ब्लॉकसाठी आवश्यक नियोजन सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT