Dog sakal
मुंबई

Thane Dogs: ठाण्यात तब्बल ६४ हजार श्वानांचे झाले निर्बिजीकरण!

सकाळ डिजिटल टीम

Thane Dogs: मागील काही दिवसांपासून ठाणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी ठाणे पालिकेच्या माध्यमातून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यावर भर देण्यात येत असतो, असे पालिकेने सांगितले आहे. त्यानुसार मार्च २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या १८ महिन्यांच्या कालावधीत ६४ हजार ४९१ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ठाणे शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांची दहशत पसरत आहे. पालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेका जण जखमी झाल्याच्या घटना समोर येत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांच्या समस्या वाढत आहेत. मात्र, कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येत असते. पालिका हद्दीतील भटक्या व पिसाळलेल्या कुत्रांच्या २०१८ पासून निर्बीजीकरण प्रक्रियेलाच ब्रेक लागल्याची बाब समोर आली.

त्यानंतर पुन्हा निर्बीजीकरण प्रक्रियेबाबत २०२१ मध्ये नवीन टेंडर काढण्यात आले असून त्याची वर्क ऑर्डर देखील देण्यात आली. त्यानुसार मार्च २०२२ पासून शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकारणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याचे चित्र दिसून आले. त्यात जानेवारी २०२३ ते सप्टेंबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत १२ हजार ९८७ जणांना कुत्र्यांनी आपले लक्ष्य केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा मुद्दा पुढे आला. दरम्यान, ठाणे महापालिका हद्दीत मार्च २०२२ पासून ते ऑक्टोबर २०२३ या १८ महिन्यांच्या कालावधीत ६४ हजार ४९१ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असल्याची माहिती पशु वैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT