Thane Hospital  sakal
मुंबई

Thane Hospital News : कळव्याच्या 'त्या' रुग्णालयात गेल्या ७ महिन्यात झाला आहे १००० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू !

Thane Hospital News : रुग्णालयात ३,२९९ बालकांचा जन्म देखील झाला

सकाळ डिजिटल टीम

Thane Hospital News : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या सात महिन्यांत एक हजार ६१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर रुग्णालयात ३,२९९ बालकांचा जन्म देखील झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री १७ जणांचा उपचारारादम्यान मृत्यू झाल्याने हाहाकार माजला. त्यामुळे सर्वच स्तरावरून रुग्णालय प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागले. त्यातच येथील भोंगळ कारभार समोर आला. याशिवाय रुग्णालयात २०२३ च्या जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत १,०६१ जणांना मृत्यू झाल्याची बाब पुढे आली.

एक हजार रुग्ण उपचारार्थ दाखल होत असतील तर सरासरी मृत्यूचा आकडा हा सात महिन्याला ४९ असल्याचे शासकीय आकडेवारीत म्हटले आहे. तर दुसरीकडे याच रुग्णालयात जन्माला येणाऱ्या नवजात शिशुची संख्या ही मृत्यू होणाऱ्या रुग्णांपेक्षा तिप्पट असल्याची बाब पुढे आली आहे. म्हणजे सात महिन्यांत ३,२९९ बालकांचा जन्म झाला असला तरी त्यातील १११ बालकांना हे जग पाहता आले नाही. पण, उर्वरित ३,१८८ बालकांनी या जगात पाऊल टाकले आहे.

ते हे जग येथील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांमुळे पाहत आहे, हेही तितकेच खरे आहे. गतवर्षीपेक्षा या वर्षी ५५ अधिक बालके रुग्णालयात जन्माला आली आहेत. त्यामध्ये पाच मृतावस्थेत, तर ५० बालक सुखरूपपणे जन्माला आली असल्याचे सांगण्यात येत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT