मुंबई

कल्याण-डोंबिवली, ठाण्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर?, रुग्णांचा आकडा धक्कादायक

पूजा विचारे

मुंबईः कोरोनानं सर्वत्र हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असताना कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. MMR म्हणजेच मुंबई महानगर क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे (Thane), कल्याण-डोंबिवली (KDMC),मिरा-भाईंदर (mira bhayandar), भिवंडी, उल्हासनगर या महापालिका क्षेत्रांमध्ये आणि आसपासच्या मोठ्या उपनगरांमध्ये वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढताहेत. कल्याण-डोंबिवली, ठाणे हे भाग आता कोरोनाचे एक नवीन हॉटस्पॉट म्हणून उदयास येतंय. रुग्ण दुप्पट व्हायचा काळही (doubling rate) मुंबईच्या तुलनेत खूप कमी आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये परिस्थिती भयावह 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे ५२४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५९८ वर गेली आहे. गुरूवारी ६०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या येथे ६२०८ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ८१६५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२५ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व १०१, कल्याण प. १३४, डोंबिवली पूर्व १४१, डोंबिवली प.१०६, मांडा टिटवाळा ४, मोहना ३३ तर पिसवली येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 52 दिवसांवर आला आहे. हाच कालावधी कल्याण डोंबिवलीमध्ये फक्त 12 दिवसांचा आहे. ठाण्यात 20 दिवसात रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.

वाढती रुग्णसंख्या पाहता 'धारावी पॅटर्न' कल्याण-डोंबिवली शहरात राबविण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. प्रत्येक प्रभागातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संघटना आणि खासगी डॉक्टर यांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केलंय. 

महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (16 July) जारी केलेल्या कोविड आकडेवारीत सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण ठाणे जिल्ह्यात आहेत. मुंबईपेक्षाही ठाण्यात अॅक्टिव्ह प्रकरणं जास्त आहेत.  

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढीचा वेग कल्याण-डोंबिवलीत आहे. त्यानंतर मीरा भाईंदर, ठाणे शहर, उल्हासनगर आणि भिवंडीतही रुग्णवाढ मोठी आहे. पालघर जिल्ह्यात मोडणाऱ्या वसई विरार महापालिकेत झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत.

16 जुलैची आकडेवारी

  • अॅक्टिव्ह केसेस
  • मुंबई - 24307
  • ठाणे - 34821
  • पालघर - 4805
  • रायगड - 4779

रुग्ण दुप्पट होण्याचा वेळ (दिवसांमध्ये)

  • मुंबई -  52
  • ठाणे - 20
  • कल्याण डोंबिवली - 12
  • वसई विरार - 12
  • मीरा भाईंदर - 15
  • उल्हासनगर - 14
  • भिवंडी निजामपूर - 23

कल्याण डोंबवली, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, भाईंदर आणि ठाण्यात परिस्थिती कठीण होत चालली आहे.

thane kalyan dombivali corona virus condition day by day worst

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT