culprits arrested
culprits arrested sakal media
मुंबई

ठाणे : डिलिव्हरी बॉयची फसवणूक करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारास अटक

नरेश शेंडे

ठाणे : ऑनलाईन शॉपिंगच्या (online shopping) माध्यमातून ई-टेलर वेबसाईटच्या डिलिव्हरी बॉयची फसवणूक (fraud crime) करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांस (three culprit arrested) कासारवडवली पोलिसांनी अटक केलीय. डिलिव्हरी बॉयने आणलेले महागडे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बदलून त्याच पार्सलमध्ये सोपबार ठेवून कंपनीला फसवण्याचं काम हे तिघे आरोपी करत होते. नगऱ्या उर्फ किरण बनसोडे (२५), दिपक चौधरी उर्फ मनजीत सिंग (२२) आणि रॉबिन अरुजा (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ आणि गुजरातमध्येही त्यांनी फसवणूकीचे गुन्हे केले आहेत. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (kasarvadavali police arrested three culprit in online shopping fraud crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे आरोपी वेगवेगळ्या सिम कार्डचा वापर करुन इ-टेलर वेबसाईटवर महागडे इलेक्ट्रॉनीक्स ऑर्डर करायचे. डिलिव्हरी बॉय पार्सल घेवून आल्यावर त्याला किंमतीपेक्षा कमी रोख रक्कम द्यायचे.

त्यामुळं डिलिव्हरी बॉय पैसे मोजण्यात व्यस्त व्हायचे. त्यावेळी एक जण पार्सल आणलेले गॅजेट्स काढून त्यात सोपबार ठेवून पुन्हा तेच पार्सल सिलबंद करायचे. या तिनही आरोपींनी यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT