Thane Loksabha: sakal
मुंबई

Thane Loksabha: ..तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याची निवडणूक जाणार जड?

सकाळ वृत्तसेवा

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्याची लोकसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जड जाऊ शकते असे म्हटले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कामं केली आहेत. याचबरोबर स्थानिक नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी घेतलेली फारकत आणि त्यानंतर शिवसेना पक्षावर मिळवलेला ताबा ही कित्येक ठाणेकरांना न आवडलेली बाब असल्याचे पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे ठाण्याची जागा एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने व त्यातही नरेश म्हस्के यांना तिकीट देण्यात आले असल्यामुळे भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही निवडणूक जड जाऊ शकते असे चित्र पाहायला मिळत आहे.

ठाण्याचे विद्यमान खासदार हे राजन विचारे असून त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये ठाकरे गटाने उतरवल आहे. राजन विचारे यांचा संपूर्ण मतदारसंघांमध्ये बऱ्यापैकी प्रस्थ आहे. याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या अवतीभवतीच्या काही लोकांमुळे नाराज झालेले कित्येक जण हे सध्या राजन विचारे यांचा प्रचार करत असल्याच दिसत आहे.

त्यातही राजन विचारे किंवा नरेश मस्के या दोघांमध्ये जर विचार केला तर उमेदवार म्हणून राजन विचारे हे उजवे असल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे. मात्र म्हस्के यांच्या पाठीशी शिंदे असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मानणारा ठाणेकर हा आज तरी म्हस्कें सोबत उभा आहे.

आशावेळी ठाण्याची लढत ही नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे अशी होणार नसून ती थेट एकनाथ शिंदे विरुद्ध राजन विचारे अशीच होणार आहे. तर दुसरीकडे हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला आपल्या बाजूने वळून घ्यायचा होता मात्र तो भाजपाला न मिळाल्याने भाजपमध्ये अंतर्गत खदखद असल्याचे पाहायला मिळत असून प्रचारामध्ये भाजप मनसे इतके स्वतःला झोकून देत नसल्याचे पाहिला मिळत आहे

Thane LoksabhaThane Loksabha

या सर्व बाबी लक्षात घेता एकनाथ शिंदे यांना आपल्या बालेकिल्ल्याची लोकसभा निवडणूक जिंकणं कठीण जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र ज्याप्रकारची जादू एकनाथ शिंदे यांची ठाण्यामध्ये आहे ते पाहता निसटता का होईना पण नरेश मस्के यांचा ठाण्यामध्ये विजय होईल असे म्हटले जात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT