आत्महत्या 
मुंबई

प्रेयसी म्हणाली, जा मर; FB Live करत प्रियकराने संपवली जीवनयात्रा

सकाळ वृत्तसेवा

प्रेमांमध्ये तरुणीने धोका दिल्यामुळे कल्याणमध्ये एका तरुणानं फेसबूक लाईव्ह करत जीवनयात्रा संपवली आहे. तरुण मुळचा जालना येथील होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यानं मुंबई गाठली होती. येथे कल्याणमध्ये त्याला एका खासगी रुग्णालयात चांगल्या पगारावर काम मिळाले. यावेळी येथे घटस्फोट झालेल्या एका तरुणीसोबत त्याची ओळख झाली व त्याचे रूपांतर प्रेमात झाले. मागील तीन वर्षांपासून दोघे प्रेमात होते. लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. पण तरुणी आणि दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. तरुणीने लग्नाला नकार दिला. 'प्रेयसी पहिल्यासारखं बोलत नाही, प्रतिसाद देत नाही. विचारणा केली तर तुझा-माझा संबंध नाही, तू मरून जा..' असं प्रेयसीने म्हटल्यानंतर तरुणाने फेसबुक लाइव्ह करून गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

प्रेयसीने झिडकारल्याने अंकुश पवार (वय २७, मूळ रा. जालना) या प्रियकराने गुरुवारी (ता. ५) सकाळी समाजमाध्यमावर लाइव्ह करत आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. अंकुश कल्याणमधील एका खासगी रुग्णालयामध्ये वॉर्डबॉय होता. एका घटस्फोटित तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते.पण ती पैसे घेऊन मौजेसाठी उडवत असल्याचा जाब विचारल्याने दोघांत वाद झाला होता. यातूनच तरुणाने टोकाचे पाऊल उचललं. प्रेयसीच्या छळाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT