Central Railway esakal
मुंबई

Mumbai News : ठाणे-मुलुंड दरम्यान शनिवारी रात्री ट्रॅफिक ब्लॉक! लोकल, मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल!

मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकातील जुना पादचारी पुल तो़डण्यासाठी शनिवार, ३ फेब्रुवारीच्या रात्री ठाणे ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकातील जुना पादचारी पुल तो़डण्यासाठी शनिवार, ३ फेब्रुवारीच्या रात्री ठाणे ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यत ५ तासांचा ब्लॉक असणार आहे. यादरम्यान लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल केले आहेत.

ब्लॉक दरम्यान रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून डाउन जलद मार्गावरील खोपोली ट्रेन विद्याविहार ते दिवा स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावरुन वळविण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी येथून रात्री ९वाजून ५४ मिनिटांनी सुटणारी कल्याण आणि कल्याण स्थानकातून रात्री ११वाजून ५ मिनिटांनी सुटणारी सीएसएमटी लोकल रद्द केल्या आहेत.

२२१५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चेन्नई सुपरफास्ट मेल, २०१११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव एक्सप्रेस, ११०५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमृतसर एक्सप्रेस, ११०४१ दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस, ११००३ दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस, २२१७७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बनारस महानगरी एक्सप्रेस या गाड्या शनिवारी रात्री विद्याविहार ते ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावरुन वळविण्यात येणार असल्याने निर्धारित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.

तर मुंबईत येणाऱ्या ११०२० भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस, १२८१० हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल, १२१३४ मंगळुरु-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, १२७०२ हैदराबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेन सागर एक्सप्रेस आणि १११४० गदग-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस कल्याण/ठाणे ते विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावरुन धावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Pune road traffic : कोल्हापूर -पुणे हायवेवर कांद्याने भरलेला ट्रक पलटी; पुण्याकडील वाहतूक ठप्प

Karad Chiplun Railway: कऱ्हाड-चिपळूण लोहमार्गाची आशा मावळली; गेल्या ३० वर्षांच्या मागणीकडे दुर्लक्ष, ‘कोल्हापूर- वैभववाडी’स केंद्राची मंजुरी!

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई–पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक सुरळीत, अपघातग्रस्त गॅस टँकर हटवला; ३२ तासांचा थरार संपला

आजचे राशिभविष्य - 5 फेब्रुवारी 2026

आता ‘या’ लाभार्थींचे रेशनधान्य बंद! आधारकार्डवर चूका, १०० वर्षांवरील १०२ अन्‌ १८ वर्षांखालील ९८ चिमुकली कुटुंबप्रमुख, वाचा...

SCROLL FOR NEXT