eknath shinde  sakal
मुंबई

Thane News : ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना मिळणार २४००० रुपयांचे सानुग्रह अनुदान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २४ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी आनंद योग कुटिर येथे केली.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २४ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी आनंद योग कुटिर येथे केली. ठाणे पालिकेने सन २०२२-२३साठी २१ हजार ५०० रुपये इतके सानुग्रह अनुदान दिले होते. त्यात २ हजार ५०० रूपयांची वाढ करून २४ हजार देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना ३० हजार सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी युनियन तर्फे करण्यात आली होती. तसे पत्र देख प्रशासनाला सादर करण्यात आले होते. या बाबत युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत होते.

युनियनचे उपाध्यक्ष मोहन तिवारी यांनी १० ऑक्टोबर रोजी आयुक्त सौरभ राव यांच्या बरोबर चर्चा केली. चर्चेत माननीय आयुक्तांनी सांगितले की कामगार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच सानुग्रह अनुदान अदा करण्यास तत्वतः मान्यता दिली.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा करून सानुग्रह अनुदान जाहीर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी कामगार कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना न्याय दिला आहे. यावर्षी सुद्धा त्यांनी २४ हजार सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT