मुंबई

"आयुक्तांनी राजीनामा द्यावा आणि शिवसेनेच्या उमेदवारीवर पालिका निवडणूक लढवावी"

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्प (Thane municipal corporation budget) सादर करण्यापूर्वीच तो वृत्तपत्रांमध्येच छापण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प फुटला, यास आयुक्त डॉ. विपिन शर्मा (dr vipin sharma) हेच जबाबदार आहेत. त्यांची भूमिका शिवसेनाभिमुख असल्याने त्यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा (resignation) द्यावा आणि आगामी ठाणे पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार (shivsena candidate) म्हणून निवडणूक लढवावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष, माजी खासदार आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी आयुक्तांवर शरसंधान केले.

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प गुरुवारी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. मात्र, हा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच तो एका वृत्तपत्रामध्ये छापण्यात आला होता. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्येच गदारोळ केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी आक्रमक भूमिका घेतली. आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एका वृत्तपत्रामध्ये महापालिकेचा संपूर्ण अर्थसंकल्प छापून आला. म्हणून मी स्वत: राज्याचे मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांच्याकडे तक्रार करणार आहे.

तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडेही तक्रार करणार आहोत. डॉ. शर्मा हे शिवसेनेचे शाखाप्रमुख असल्यासारखे वागत आहेत. आपण या संदर्भात नौपाडा पोलिस ठाण्यातही गोपनियता कायद्याचा भंग केल्याप्रकरणी आयुक्तांविरोधात लेखी तक्रार नोंदविणार आहोत. दरम्यान, सदर अर्थसंकल्प फुटला असल्याने तो नव्याने सादर करावा, अशी मागणीही परांजपे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parner News: सहकार क्षेत्रात खळबळ! सैनिक सहकारी बँकेच्या १७ जणांचे संचालक मंडळ बरखास्त; पारनेरच्या सहायक निबंधकांची नियुक्ती..

Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्‍या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्‍यू, दुसरी गंभीर

Ashok Kharat: "मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!

Beed News: विद्यापीठाच्या अॅडमिशनवेळीच आता विमा; जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांना मिळणार सुरक्षा कवच; ‘वैद्यकीय’ मात्र ऐच्छिक

Chhatrapati Sambhajinagar: वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर झुंबड; ‘नो स्टॉक’चे बोर्ड; शेतीकामे, विवाह सोहळ्यांसह वाहतुकीला मोठा फटका

SCROLL FOR NEXT