मुंबई

ठाणे पालिकेचे पाणी बिल वसुलीकडे दुर्लक्ष; कोपरीतील सोसायटीला पाठविले साडेएकोणीस लाखाचे बिल 

दीपक शेलार

ठाणे: ठाणे महापालिका आयुक्तांनी महसूल वाढविण्यासाठी मालमत्ता कर आणि पाणी बिलाच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवल्यानंतरही बिलाच्या वसुलीकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे. थकबाकीचा डोंगर उभा करून आता ऐन लॉकडाऊन काळात ठाणे पूर्वेकडील एका सोसायटीला लाखोंचे बील पाठवल्याने रहिवासी हादरले आहेत. तब्बल साडे 19 लाखांचे पाणी बील आल्याने कोपरीतील श्रमदान सोसायटीतील रहिवाशांनी व्यक्तीगत बिले देण्याची मागणी केली आहे. 

कोपरी पूर्व परिसरात श्रमदान को. ऑप. हौ.सोसायटी ही 20 सदस्य असलेली सोसायटी आहे. ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाने या सोसायटीला 2020-21 चे पाणी बिल थकबाकीसह 19 लाख 48 हजार इतके पाठवल्याने रहिवासी हादरले आहेत. गेले काही महिने लॉकडाऊन असल्याने हाताला काम नाही. अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या रकमेचे बील कसे भरावे ? या विवंचनेत रहिवासी आहेत. अशा लाखो रुपयांच्या पाणी थकबाकीमुळे महापालिकेची दफ्तर दिरंगाईदेखील समोर आली आहे. 

यासंदर्भात, पालिकेचे जलअभियंता अर्जुन अहिरे, कार्यकारी अभियंता विनोद पवार आणि कोपरीच्या सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांना संपर्क साधला मात्र, कुणीही प्रतिसाद दिला नाही.

व्यक्तीगत बिलांची मागणी
सोसायटीतील काही रहिवासी पाणी बिल भरण्यास टाळाटाळ करीत असतानाही सोसायटीनेही तब्बल 20 वर्ष चालढकल केली. सोसायटीच्या काही सदस्यांनी ठाणे महापालिका आयुक्त यांच्याकडे अनेकवेळा लेखी स्वरुपात निवेदन देऊन पाणी बिल प्रत्येक सदस्यांना त्यांच्या नावावर व्यक्तिगत देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. मात्र याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price fall before Dhanteras Diwali : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी स्वस्त! एकाच झटक्यात दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे भाव..!

फटाके बनवताना भीषण स्फोट! ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

SCROLL FOR NEXT