Thane Municipal Corporation
Thane Municipal Corporation  sakal
मुंबई

Thane News : ठाण्यात पोस्टर्स, बॅनरसाठी धोरण जाहिर; बेकायदा पोस्टरबाजीला बसणार आळा

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - शहर सौर्यीकरणात ग्रहण बनलेल्या बेकायदा पोस्टरबाजीला लगाम घालण्यासाठी उशिरा का होईना ठाणे महापालिकेला जाग आली आहे. पालिकेच्या परवानगी शिवाय आणि नेमून दिलेल्या जागेशिवाय यापुढे कुणालाही तात्पुरते बॅनर आणि पोस्टर लावता येणार नाही . ही प्रक्रीया अधिक प्रभावी व्हावी यासाठी पालिकेने जाहिरात धोरण जाहिर केले आहे.

त्यानुसार पालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समित्यांमध्ये तात्पुरते होर्डींग आणि बॅनर लावण्यासाठी एकूण २०४ जागा ठरविण्यात आल्या आहेत. प्रती दिन, प्रती चौरसफूट शंभर रूपये याप्रमाणे या पोस्टरबाजीसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हाणजे महापालिकेची ऑनलाईन परवानगीनंतर आगाऊ भाडे भरल्यावरच या जागांवर तीन दिवसांपर्यंत पोस्टर, बॅनर लावण्याची परवानगी मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे उपक्रमांतर्गत शहरात मोठ्याप्रमाणात सौंदर्यीकरणाची काम झाली आहेत. हा बदल घडत असताना दुसरीकडे ठस्वागत, शुभेच्छांच्या राजकीय पोस्टरबाजीने शहराला बकालपणा आलेला आहे.छोट्या मोठ्या होर्डींग सह रंगवलेल्या भिंती, मेट्रोचे पिलर ही यातून सुटलेले नाहीत.

त्यात बेकायदा जाहिरात होर्डींग, आणि पोस्टरबाजीचेही दुखणे वाढले आहे. या प्रकृतीला आळा बसावा म्हणून बेकायदा पोस्टरबाजीच डिप क्लिनिंग ' करण्याची मोहम पालिकेने उभारली आहे. त्यासाठी सर्वप्रथम तात्पुरत्या होर्डींग आणि पोस्टर्ससाठी प्रशासनाने धोरण जाहिर केले आहे.

पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महानगरपालिकेने होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी प्रकारच्या तात्पुरत्या जाहिराती लावण्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत. त्यासाठी पोर्टल तयार केले आणि या प्रकारच्या जाहिरातींवर लावण्यासाठी क्यू आर कोड उपलब्ध होतील, अशी व्यवस्था केली असल्याची माहिती उपायुक्त (जाहिरात) महेश सागर यांनी दिली.

ही एक खिडकी योजना असून परवानगी घेण्यासाठी महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीनेच ही परवानगी दिली जाणार आहे, असेही महेश सागर यांनी स्पष्ट केले आहे.

क्युआर कोड बंधनकारक

तात्पुरत्या जाहिरातींसाठी ८ बाय ६, ८ बाय ३ आणि ६ बाय ३ असे तीन प्रकार निर्धारित करण्यात आले असून त्यांच्यासाठी प्रती दिन, प्रती चौ. फूट १०० रुपये याप्रमाणे भाडे आकारले जाणार आहे. या जाहिरातींसाठी परवानगी घेण्यासाठी https://tmc.advertisepermission.in/या वेब पोर्टलवर अर्ज करता येईल.

त्यात आवश्यक त्या जागा, फलकाचा आकार ही माहिती भरल्यानंतर किती भाडे भरावे लागेल याची माहिती येईल. त्यानुसार, ऑनलाईन भाडे भरल्यावर क्यू आर कोड तयार होईल. हा क्यू आर कोड तात्पुरत्या जाहिरातींवर लावणे बंधनकारक असल्याचे उपायुक्त महेश सागर यांनी सांगितले.

प्रभागनिहाय निश्चित झालेल्या जागा

अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग, जाहिरात विभाग आणि सर्व प्रभाग समितींचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रभाग समितीनिहाय तात्पुरते फलक लावण्यासाठी जागा निश्चित केल्या. त्यात माजिवडा-मानपाडा (५२), लोकमान्य नगर- सावरकर नगर (१९), वर्तकनगर (०६), कळवा (०५), वागळे (१९), मुंब्रा (५), उथळसर (१५), दिवा (४०), नौपाडा (२२), कोपरी (२१) अशा एकूण २०४ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT