Thane  sakal
मुंबई

Thane : उत्सव जोमात, समस्या जैसे थे!

रस्ते, पाणी समस्येकडे लक्ष दॆण्याची मागणी

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : ‘गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही...’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मूलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरू झाला असून दांडिया उत्सव राजकीय पक्षांकडून आयोजित केले गेले आहेत. यासाठी शहरातील मैदाने सज्ज झाली असून रस्त्यांवर बॅनरबाजी, कमानी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्सवांवर बक्कळ पैसा राजकीय पक्षांकडून खर्च केला जात असताना येथील समस्यांकडे थोडे पहाल का, अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत.

वाहन कोंडी, अरुंद रस्ते, खड्डे पडून रस्त्यांची झालेली चाळण, कचरा, प्रदूषण, पाणीटंचाई यांसारख्या समस्यांना गेले कित्येक वर्षे कल्याण डोंबिवलीकर तोंड देत आहेत. रस्त्यांच्या कामावरून सध्या येथील राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आरोप-प्रत्यारोप करण्यात जेवढी तत्परता दाखविले जात आहे, तेवढी तत्परता समस्या सोडविण्यासाठी मात्र कोणाकडून दाखविली जात नाही. या समस्यांकडेही थोडे लक्ष द्या, अशी मागणी नागरिक करत आहेत.

सण, उत्सव काळात कमानींसाठी रस्ता खणला जातो. त्याची दुरुस्ती मंडळांकडू केली जात नाही. समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी कार्यक्रम घेतले जातात. राजकारण्यांनी विचार करण्याची गरज आहे.

- उदय पेंडसे, नागरिक

वर्षानुवर्षे समस्या जशाच्या तशा आहेत. रस्त्यांवर खड्डे असणारच याची लोकांना एवढी सवय झाली आहे की, देवगडचा आंबा म्हणजे हापूस असा पेटेंट केला गेला तसाच डोंबिवली म्हणजे खड्डे असा पेटंट करायला हरकत नाही.

- विवेक पंडित, संस्थापक, विद्यानिकेतन शाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT