banner sakal
मुंबई

Thane News : ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नविन बॅनरची चर्चा

निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षासह चिन्ह दिले. तर, शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षासह चिन्ह दिले. तर, शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव मिळाले. त्यानंतर दोन्ही गटात आरोपप्रत्यारोप करण्यात येत आहे. अशातच आता, ठाण्यात हातातील घड्याळ चोरलं; पण, मनगट आमच्याकडेच आहे! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार. असे बॅनर बुधवारी ठाण्यात लावण्यात आले होते.

त्यातच आता शरदचंद्र पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी नवे बॅनर्स शहरात लावल्याचे दिसत आहे. त्याच्यावर चिन्ह तुम्हारा, 'बाप' हमारा असा उल्लेख करून अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. या बॅनरची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती.

निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिवसेना शिंदे गटाप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला दिले आहे. तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असा नवा गट तयार झाला आहे.

त्यानुसार बुधवारी पक्षाच्या नावाचा बॅनर्स शहरात लावण्यात आले होते. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवा बॅनर्स लावला आहे. या बॅनर्सवर शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला असून जीत तो आज भी हमारी हुई है !

चिन्ह तुम्हारा, 'बाप' हमारा असे शब्दात अजित पवार गटावर निशाणा साधण्याचे काम केले आहे. बाप हा शब्द लाल अक्षरात आहे. तसेच त्याच्यावर जितेंद्र आव्हाड यांच्यासह जिल्ह्यध्यक्ष, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि अन्य एकाचे नाव आहे. या बॅनर्स ला आता अजित पवार गटाकडून काय उत्तर मिळते हेच पाहावे लागणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात सातत्याने सुरू असलेल्या या बॅनर्स वॉरची सवय ठाणेकर नागरिकांना झाली आहे. मात्र अजित पवार गट या बॅनर्सला उत्तर देईल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT