मुंबई

Thane News: पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, छंद जोपासावेत

सकाळ वृत्तसेवा

Thane News: “विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे सरस्वती इंग्लिश शाळा नेहमीच करत असते,” असे मत शाळेचे ट्रस्टी संजय दबडघाव यांनी व्यक्त केले.

ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील सरस्वती इंग्लिश मिडीयम शाळेत शुक्रवारी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टींनी मत व्यक्त केले. सरस्वती पूजन श्रीराम भालेराव व इतर मान्यवरांनी केले.

तर कार्यक्रमाचे उदघाटन संजय दबडघाव यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री गणेशाच्या नृत्याने झाली. यावेळी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या वेळी शाळेचे शिक्षक , ट्रस्टी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका डॅारीस डिमेलो यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT