Thane News sakal
मुंबई

Thane News: भाजपने शिवसेनेला करु दिला नाही उमेदवाराचा प्रचार; वाद चव्हाट्यावर

भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभागात शिवसेना शिंदे गटाने सर्व्हे करायचा नाही, महायुती आम्ही मानत नाही

सकाळ वृत्तसेवा

Badlapur Poltical News: बदलापूर शहरात लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार असलेल्या कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ सर्व्हेसाठी गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्याने रोखल्याची घटना समोर आली आहे.

भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभागात शिवसेना शिंदे गटाने सर्व्हे करायचा नाही, महायुती आम्ही मानत नाही, अशा शब्दात भाजप पदाधिकाऱ्याने शिंदे गटाचा सर्व्हे रोखल्याने शहरात महायुतीत चालू असलेले अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले आहे.(shivsena vs bjp )

शिवसेनेचे पदाधिकारी सुदाम घुगे यांनी पक्षश्रेष्ठी व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिलेल्या आदेशानुसार, कपिल पाटील यांच्या प्रचाराचे काम सुरू केले आहे. सुदाम घुगे यांच्या पत्नी व सेनेचे इतर पदाधिकारी हे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ कात्रप परिसरात गेले होते.

या वेळी रहिवासी इमारतीमध्ये मतदारांच्या सर्व्हेसाठी गेले असता या कामात भाजपचे माजी नगरसेवक नरहरी पाटील व माजी नगरसेविका प्रमिला पाटील यांचे पुत्र व भाजपचे युवा पदाधिकारी आदित्य पाटील यांनी सर्व्हेचे काम करण्यापासून आपल्याला रोखले असल्याचे घुगे यांनी सांगितले.(bhiwandi loksabha)

यावर घुगे यांनी हे काम महायुतीच्या प्रचारासाठी करत आहोत, तसे आदेशच पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे सांगितले. यावर आपण महायुतीचे पदाधिकारी असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र आदित्य पाटील यांनी कठोर शब्दात घुगे यांना खडे बोल सुनावत आम्ही युती मानत नाही, कात्रप हा प्रभाग भाजपच्या नगरसेवकांचा आहे आणि इथे सर्व्हे आम्हीच करणार असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे शहरात महायुतीला अंतर्गत राजकारणाने घेरल्याचे दिसून आले. याचा फटका आपसूकच कपिल पाटील यांना बसेल, यांची चर्चा सर्वत्र सुरू आहे.(kalyan news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT