मुंबई

Thane News: जिल्हा रुग्णालयातही करण्यात येणार मोफत नेत्र शस्त्रक्रिया

Thane News: राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियानात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र पंधरवडा कार्यक्रम रुग्णालयात सुरू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पहिले जाते. याच रुग्णालयात आता, खासगी रुग्णालयात होणाऱ्या डोळ्यांच्या महागड्या शस्त्रक्रिया आता करण्यात येत आहे.

राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियानात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र पंधरवडा कार्यक्रम रुग्णालयात सुरू झाला आहे. नेत्र तपासणीत, मोतीबिंदू, लहान मुलांचा डोळ्यांचा तिरळेपणा, काच बिंदू सारख्या शस्त्रक्रिया मोफत पार पडत असल्याची रूग्णाल प्रशासनाने दिली.

डोळ्यांच्या बाबतील कायमच काळजी घेतली पाहिजे. थोड दुर्लक्ष झालं तर अंधत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी नियमित डोळे तपासणी करणे आवश्यक आहे. अनेकांना मोतीबिंदू झाला असल्याचे समजत देखील नाही.

तर काहीजण मोतीबिंदूचा खर्च परवडत नसल्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी टाळाटाळ करताना दिसतात. मात्र याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता असते. महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याच्या दृष्टीने सरकार कडून प्रयत्न केले जात आहेत.

सिव्हील रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान कार्यक्रम राबवला जात असल्याची माहिती नेत्र सर्जन डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.

राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियानात महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याचे प्रयोजन महाराष्ट्र शासनाचे आहे. यासाठी ४ मार्च पर्यंत ठाणे सिव्हील रुग्णालयातील नेत्र विभागात मोतीबिंदू सोबत डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. नेत्र चिकित्सा करण्यासाठी अद्यावत मशीन असून, खाजगी रुग्णालयात होणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत.

मोतीबिंदू कोणत्या ही वयात होत असला तरी, वयाच्या चाळिशी नंतर होण्याची शक्यता अधिक असते. धुम्रपान, लठ्ठपणा, वृद्धत्व, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्टिरॉइड औषधे, कौटुंबिक इतिहास, डोळ्यांवर आघात अशा कारणांमुळे मोतीबिंदू होतो. मात्र वेळीच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. नाहीतर कायमची दृष्टी जाण्याची शक्यता असते.

- डॉ. शुभांगी अंबाडेकर, नेत्र सर्जन, ठाणे जिल्हा रुग्णालय.

डोळ्यांचा मोतीबिंदू रोखायचा झाल्यास नियमित डोळ्यांची तपासणी करावी. धूम्रपान सोडणे, निरोगी आहार घेणे, अँटिऑक्सिडंट्स फळे आणि भाज्या खाव्यात, प्रखर उन्हात यूव्ही ब्लॉकिंग सनग्लासेस घालणे गरजेचे आहे.

- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT