ठाणे: कळव्यात गाळा देण्याच्या नावाने तिघांनी केली 50 लाखाची फसवणूक  
मुंबई

ठाणे: कळव्यात गाळा देण्याच्या नावाने तिघांनी केली 50 लाखाची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

कळवा (जि. ठाणे) - कळवा स्टेशन रोड परिसरात दत्तवाडी येथे राहणाऱ्या एकाची गाळा मालक असणाऱ्या पती, पत्नी व इस्टेट एजंट यांनी गाळा देण्याच्या बहाण्याने 50 लाखाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

कळवा दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या पोपटराव भास्कर चौधरी यांनी स्टेशन रोडवर असलेल्या जैनम आरकेंड येथे तळमजल्यावर असलेल्या गाळा क्र 4 हा इस्टेट एजंट सतीश रिचारला यांच्या मध्यस्थीने या गाळ्याचे मालक शर्मिला कपोते व हिरोज कपोते यांच्या कडे 50 लाखाचा व्यवहार 5 ऑक्‍टोबर 2016 रोजी केला होता या व्यवहारात चौधरी यांनी 20 लाख रुपये रोख रक्कम व 30 लाख रुपये लोन असे 50 लाख रुपये कपोते दांपत्याना दिले आहेत परंतु आठ महिने उलटल्या वर ही गाळा नावावर न केल्याने शनिवारी चौधरी यांनी कळवा पोलिसात तक्रार दाखल केली कळवा पोलीसांनी या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, या संदर्भात कळवा पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझी ओळख, माझे नाव, माझा चेहरा... गौतम गंभीरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; २.५० कोटींचा नुकसानीचा दावा, नेमकं काय प्रकरण?

Krishna River Pollution: कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात! सातारा, सांगली पट्ट्यात पाण्याची गुणवत्ता खालावली; ‘प्रदूषण’चा शासनास अहवाल..

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत गुढीपाडव्याचा जल्लोष; विकासकामांच्या चित्ररथाने वेधलं लक्ष

HDFC Bank Chairman: कोण आहेत अतनू चक्रवर्ती? गुजरातचे माजी IAS ते HDFC बँकेचे चेअरमन आणि आता अचानक राजीनामा

Pune Rain : हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; गुढी पाडव्यालाच पुण्यात पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT