Indurikar maharaj  sakal
मुंबई

Thane News: "अंगातील ताकद खिशातील पैसा आयुष्यातील वेळ" जपुन वापरा

Bhivandi news इंदुरीकर महाराजांचे पडघ्यामध्ये आवाहन;

सकाळ वृत्तसेवा

Padgha News: "अंगातील ताकद खिशातील पैसा आणी आयुष्यातील वेळ" जपुन वापरा असे आवाहन प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी भिवंडी तालुक्यातील साईधारा लॉजेस्टीक पार्क भोईरगांव येथील किर्तनात उपस्थितांना केले.

साईधारा लॉजेस्टीक पार्क येथील मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या साईबाबा मंदिराचा 8 वा वर्धापन दिन सोमवारी गुरुवर्य . ह. भ. प. रामदास महाराज वाशेरे व ह. भ. प. केशव महाराज लाप यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विवीध आध्यात्मिक कार्यक्रम मंदीरात घेण्यात आले.तर यावेळी रात्री किर्तन करण्यासाठी प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर उपस्थित होते.

यावेळी त्यांनी "अंगातली ताकत खिशातील पैसा आयुष्यातील वेळ" जपुन वापरा कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा, कारण काळ कुणालाच माफ करणार नाही, पापाची इस्टेट लखलाभ होत नाही तसेच काळ कोणालाच सोडत नाही हे जगातील एकमेव सत्य आहे लग्न सोहळा एक दिवसांचा करून खर्च कमी करा असे इंदुरीकर महाराज यांनी आपल्या समाजप्रबोधनपर किर्तनात सांगीतले यावेळी त्यांचे किर्तन ऐकण्यासारखी पंचक्रोशीतील नागरीकांनी तुंडुब गर्दी केली होती.

यावेळी साईधारा लॉजेस्टीक पार्क चे प्रमुख उद्योजक पद्माकर भोईर, ह. भ. प. पांडुरंग भोईर माजी सरपंच संतोष भोईर, शाम पारधी कुंरूद ग्रामपंचायत सदस्य भाई पाटील, भरत शेलार साईधारा कार्यालयीन कर्मचारी भुषण सिंगासने, रुपेश पाटील, भावीक ठक्कर उपस्थित होते. तर मंदीरात दर्शन, किर्तन ऐकण्यासाठी, व महाप्रसाद घेण्यासाठी हजारो नागरीकांनी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis Interview: मोदींना आंबा, तर फडणवीसांना संत्रा… अक्षय कुमार पुन्हा ट्रोल; मुख्यमंत्र्यांनी दिलं भन्नाट उत्तर!

कफ सिरप एकच दिवस पाजलं, २२ दिवसात १६ वेळा डायलिसिस; तरीही लेकीला गमावलं, १२ लाख बिल

Akshay Kumar : अक्षय कुमारच्या मुलीकडून मागितले न्यूड फोटो; ऑनलाइन गेम खेळताना अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर....

Navid Mushrif Vs Shoumika Mahadik : गोकूळ दूध संघाकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर गंडवा गंडवीची चलाखी, प्रकरण अंगलट येणार?

Flight Ticket Price Hike: प्रवाशांच्या खिशाला फटका! दिवाळीपूर्वी रस्तेसह हवाई वाहतूक सेवा महागली; काय आहेत दर?

SCROLL FOR NEXT