मुंबई

नोकरीत ५० टक्के प्राधान्य 

सकाळवृत्तसेवा

ठाणे - स्थानिकाला रोजगार मिळालाच पाहिजे, या भूमिकेसाठी कायम शिवसेनाच आक्रमक असल्याचे चित्र आता पालटू लागले आहे. ठाणे महापालिकेच्या नोकरभरतीत स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य दिले पाहिजे, या विषयावर भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले होते. त्याला शिवसेनेची साथ मिळाल्यानंतर स्थानिक उमेदवारांना नोकरभरतीत ५० टक्के प्राधान्य देण्याचा ठराव सभागृहात मंजूर झाला आहे.

गुरवारच्या सभेत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी स्थानिक नोकरभरतीवरून आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर यापुढे महापालिकेत नोकरभरती करताना ठाणे महापालिकेच्या परिसरातील ५० टक्के व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे, अशा प्रकारचा ठराव मांडण्यात आला. त्याला सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी अनुमोदन दिले.

ठाणे महापालिकेत नुकतीच वाहनचालक, इलेक्‍ट्रिक चेकर, पाणी खात्यातील विविध पदांसाठी नोकरभरती करण्यात आली; पण या भरतीत ठाणे महापालिका परिसरातील एकाचीही निवड झाली नाही, असा मुद्दा पवार यांनी उपस्थित केला. भरतीसाठी जी लेखी परीक्षा घेण्यात आली होती, त्यात जे प्रश्‍न विचारण्यात आले होते त्यांचा आणि या कामांचा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. ही परीक्षा घेतली जाते. ही पूर्णपणे सरकारच्या निर्देशनानुसार घेतली जाते, असे सांगूनही पवार यांचे समाधान झाले नाही. 

राष्ट्रवादीसह शिवसेनेची सहमती
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अशा प्रकारचा कोणताही नियम नाही, असे सांगत स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घ्यायचा असल्यास तसा ठराव महासभेने करावा, अशी सूचना केली. चर्चेनंतर ठराव मांडून त्याला अनुमोदन देण्यात आले. हा ठराव कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल याबद्दल साशंकता असली तरी स्थानिक उमेदवारांच्या भरतीवरून भाजपचे नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर राष्ट्रवादीसह शिवसेनेचीही त्यावर सहमती मिळविण्यात भाजप यशस्वी झाल्याचे पाहावयास मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT