मुंबई

Thane News: वागळे पोलिसांना लक्ष्मीची प्राप्ती, चिमुकलीच्या स्वागतासाठी उधळली फुले, वाटले पेढे

सकाळ वृत्तसेवा

राजीव डाके

गोरा रंग, धारदार नाक, बोलके डोळे असे तिचे सुंदर रूपडे. ते पाहून तिला एकटक न्याहाळत बसावे अशी कोणाची लालसा झाली नसेल तर नवल. पण या अवघ्या दोन-तीन तासांचे वय असलेल्या सुंदरीला कुणी आणि का बरे फेकले असेल? एवढी सुंदर मुलगी कोणाला नको झाली असेल? कोण आहेत असे निर्दयी आई बाप? असे अनेक प्रश्न त्या दिवशी वागळे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या प्रत्येक पोलिसांच्या मनात उभे राहिले.

या चिमुकलीला त्यांनी पोलीस ठाण्यात आणताना तिची ओवाळणी केली. पोलीस ठाणे सजवले. तिचे नाव ' प्राप्ती ' ठेवून पेढे वाटले..

वागळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवी मनाला सुन्न करणारी ही घटना घडली. ४ फेब्रुवारी रात्री १०:३० च्या सुमारास वागळे इस्टेट मधील लुईसावडी परिसरातील साईनाथ नगरातून पोलीस ठाण्यात फोन आला. एका गल्लीमध्ये एक जिवंत अर्भक कोणीतरी टाकून गेले असल्याचे या फोनवरून सांगण्यात आले.

लागलीचरात्री कर्तव्यावर असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गुरुळे या आपल्या पथकासोबत तिथे पोहोचल्या. तिथे त्यांना एक श्री जातीचे अवघ्या काही तासापूर्वी जन्मलेले अर्भक आढळून आले.

कपड्यात गुंडाळलेल्या या अर्भकाला काहीशा मुंग्याही चिकटलेल्या होत्या. लागलीच वेळ न दवडता त्यांनी कार्बक ताब्यात घेऊन ते जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आठ दिवस उपचार झाले. या दरम्यान प्रत्येक महिला कॉन्स्टेबलने रुग्णालयात दिवस - रात्र आळीपाळीने राहून आईप्रमाणे तिची सुश्रुषा केली.

या मुलीला १२ फेब्रुवारी रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता पुढील कायदेशीर सोपस्कार पार पाडण्यासाठी तिला वागळे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गेले आठ दिवस हे पोलीस ठाणे या चिमुकल्या मुलीच्या प्रेमाने, सानिध्याने गहिवरून गेलेले होते. त्यामुळे या अर्भक मुलीला पोलीस ठाण्यात आणण्यापूर्वी सगळ्या पोलिसांनी पोलीस ठाणे फुलांनी सजवले होते.

रांगोळी काढून पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारात फुले पसरवले होते. पोलीस ठाण्यात प्रवेश करण्याआधी तिची सर्व महिला पोलिसांनी ओवाळणी केली. तिचे नाजूक पाऊल कुंकवात बुडवून तिच्या पायाच्या ठसे प्रवेशद्वारावर उमटविले. पोलीस ठाण्यातील हे दृश्य पाहून एखादी राजकुमारी, स्वप्नातली परी पोलीस ठाण्यात प्रवेश करते आहे असा भास सगळ्यांना होत होता.

सगळ्यांनी तिच्या स्वागत करून तिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रचना गुरुळे यांच्या केबिनमध्ये नेले. तिथे तिचे नाव प्राप्ती असे ठेवण्यात आले. बदली होऊन काही दिवसांपूर्वीच या पोलीस ठाण्याचा चार्ज घेणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे हे देखील हे दृश्य पाहून भावनिक झाले. डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्राप्तीला नवी मुंबईतील नेरळ येथील विश्व बाल केंद्रात दाखल करण्यात आले. या चिमुकल्या प्राप्तीला बाल केंद्रात घेऊन जाताना वागळे पोलीस ठाण्यात वेगळेच वातावरण पाहायला मिळत होते.

आठ दिवसात तिचा लागलेला लळा आणि तिला आता केंद्रात धाडताना झालेली सगळ्यांच्या मनाची घालमेल दिसून येत होती. तिला सर्वांनी मोठ्या प्रेमाने पुढील आयुष्यासाठी निरोप दिला, शुभाशीर्वाद दिले. यावेळी आणखीन एका दिवसांनी सगळ्यांना अचंबित केले. बाल केंद्रात नेण्यासाठी तिला उचलून घेतलेल्या रचना गुरुळे यांच्या कुशीत तिचा हात एखाद्या पोलिसांनी आपल्या अधिकाराला सॅल्यूट मारावा अशा प्रकारे होता. त्यामुळे आठ दिवसात सर्वाच्या सानिध्यात राहून पुढील प्रवासासाठी जाणाऱ्या प्राप्तीचे कृतज्ञता म्हणून सगळ्यांना ती नकळत असा सॅल्यूट तर मारत नाही ना अशीच भावना सगळ्यांच्या मनात आली होती.

ज्या आई बापाला ही सुंदर मुलगी प्राप्त झाली त्यांनी ती नाकारली. पण आम्हा पोलिसांना काही दिवसासाठी की होईना पण ती प्राप्त झाली. आठ दिवस आमच्या सानिध्यात राहणे हीच आमच्यासाठी मोठी प्राप्ती होती. म्हणूनच तिचे नाव प्राप्ती ठेवले. सुदैवाने तिचे हेच नाव बालकेंद्रात हे नोंदण्यात आले. त्यामुळे भविष्यात तिची या नावाची ओळख कायम राहील याचा आम्हा सर्व पोलिसांना आनंद आहे.

- रचना गुरूळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक

या मुलीला पाहून आमच्यातले आईबाप जागे झाले होते. सर्व पोलिसांनी तिची काळजी घेतली. रुग्णालयात आपल्या बाळाप्रमाणे तिचा सांभाळ केला. आता कायद्याप्रमाणे तिला बालकेंद्रात दाखल करण्यात आले आहे. तिला असे टाकून पळ काढलेल्या आई-बापांचा आता आम्ही शोध घेत आहोत.

- शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT