thane
thane sakal
मुंबई

Thane : शहरातील रस्त्यांवरील खड्डे अधिकाऱ्यांना भोवले

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : मागील दोन महिन्यापासून कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यंवर चौफेर टीका करण्यात येत आहे. या खड्ड्यंमुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली. या सर्व प्रकरणानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौरा करीत, अधिकाऱ्याची कान उघाडणी करीत जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानंतर ठाणे पालिका आयुक्त यांनी चार अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली. चेतन पटेल, प्रकाश खडतरे, संदीप सावंत आणि संदीप गायकवाड अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे असून खड्डे भरणे तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत दुर्लक्ष केल्याने या चार अभियंत्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यातआल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांसह सेवा रस्त्यानावर तसेच पूर्वद्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मागील आठवड्याभरापासून वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. या खड्ड्यंवरून भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलने करण्यात आली. त्यात अर्धा पाऊण तासाचे अंतर कापण्यासाठी दोन ते तीन तास लागत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात येत होती.

याची गांभीर्याने दाखल घेत, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी स्वतः रस्त्यावर उतरून ठाण्यातील रस्त्यांची पाहणी केली होती. यावेळी केवळ ठाणे महापालिकाच नव्हे तर एमएमआरडीए तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीचे अधिकारी आणि अभियंता देखील उपस्थित होते. आनंदनगर पासून पाहणी दौऱ्याला सुरुवात करताना पालकमंत्र्यांनी सुरुवातीलच ठाणे पालिका आणि इतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती.

रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासली जात नाही, पैसे देऊनही कामे होत नाही त्यामुळे सरकारचे नाव खराब होत असून कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा सज्जड दमच पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना भरला होता. कामांमध्ये आणि गुणवत्तेमध्ये दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेशही यावेळी एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांना दिले होते. या आदेशाची गांभीर्याने दाखल घेत, कामात गुणवत्ता नसलेल्या ठेकेदारांना नोटिसा काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश देताच, पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी शनिवारी चार अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करीत निलंबन केले. यामध्ये कार्यकारी अभियंता चेतन पटेल, प्रकाश खडतरे कनिष्ठ अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड या अभियंत्यांचा समावेश आहे. प्रकाश खडतरे हे वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये कार्यरत असून चेतन पटेल हे उथळसर प्रभाग समितीमध्ये कार्यरत आहेत. तर संदीप सावंत आणि संदीप गायकवाड हे लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये कार्यरत आहेत. संदीप सावंत यांच्या अखत्यारीत पालकमंत्र्यांच्या घरासमोरील सर्व्हिस रोड येत असून या सर्व अभियंत्यांवर कामात आणि गुणवत्ते बाबत दुर्लक्ष केल्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर प्राधिक्कारणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा ?

ठाणे महापालिका क्षेत्रात असलेले उड्डाणपूल हे एमएसआरडीसीच्या अंतर्गत येत असून या उड्डाणपुलावर देखील खड्डे पडले आहेत. पालकमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात इतर प्राधिकरणाचे अधिकारी देखील उपस्थित होते. ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली असली तरी इतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT