आशुतोष डुंबरे sakal
मुंबई

Thane Police: आयपीएस अधिकारी आशुतोष डुंबरे ठाणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त

ठाण्याच्या नवीन आयुक्तपदासाठी अमिताभ गुप्ता, प्रशांत बुरडे, आशुतोष डुंबरे व निकेत कौशिक आदींची नावे चर्चेत होती. परंतु अखेर आशुतोष डुंबरे यांची वर्णी लागली.

सकाळ डिजिटल टीम

आयपीएस अधिकारी आशुतोष डुंबरे यांची ठाणे शहर पोलिस आयुक्त पदी वर्णी लागली आहे.आशुतोष डुंबरे राज्याच्या गुप्त वार्ता विभागात कार्यरत आहेत. डुंबरे यांच्या सोबत सध्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांची राज्याच्या गुप्त वार्ता विभागात महासंचालक पदी बदली करण्यात आली आहे. राज्यातील 2 वरिष्ठ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सोमवारी गृह विभागाने जारी केली.

आशुतोष के डुंबरे 1994 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी असून त्यांची ठाणे शहर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून त्यांना बढती मिळाली आहे. त्यामुळे ठाण्यालाही नवीन आयुक्त मिळाला आहे. ठाण्याच्या नवीन आयुक्तपदासाठी अमिताभ गुप्ता, प्रशांत बुरडे, आशुतोष डुंबरे व निकेत कौशिक आदींची नावे चर्चेत होती. परंतु अखेर आशुतोष डुंबरे यांची वर्णी लागली.

बदली आदेशाची प्रत संबंधीत पोलीस अधिकारी यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेश गृह विभागाने दिले आहे.न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे आदेशाचा भंग होणार नाही याची पोलीस निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे. बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी गैरहजर राहतील त्यांना स्थित कार्यमुक्त करण्यात यावे, व त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा असे आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT