Crime Sakal
मुंबई

''हम मुंबई के स्कुल और कॉलेज में धमाके करेंगे'' ठाणे पोलीस शाळेला धमकीचा मेल

संपूर्ण हिंदुस्थानात जिहादचे पालन करण्यासाठी कुर्बानी आणि धमाका हे दोन मार्ग असल्याचे या मेलवरील मजकूरात म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : शाळा, महाविद्यालय आणि रेल्वे स्थानक बाँबने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल ठाण्यातील कोर्टनाका येथील ठाणे पोलीस शाळेच्या मेल आयडीवर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण हिंदुस्थानात जिहादचे पालन करण्यासाठी कुर्बानी आणि धमाका हे दोन मार्ग असल्याचे या मेलवरील मजकूरात म्हटले आहे. या घटनेप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे पोलिसांच्या सायबर कक्षाच्या मदतीने याप्रकरणाचा तपास सुरू आहे. (Mumbai Terrorist mail to thane police school)

ठाणे पोलिस शाळेत रविवार राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार होती. त्यामुळे शाळेतील एक शिक्षिका शनिवारी शाळेची पाहणी करत होत्या. कामगाज संपल्यानंतर त्यांनी शाळेचा मेल तपासला असता त्यवर लष्कर- २९ लष्कर अ‍ॅट दि रेटप्रोनमेल डॉट कॉम या मेलवरून मिश्न २२ असे अधोरेखित असलेला एक मेल आला होता. त्या शिक्षिकेने तो मेल उघडला असता ‘मै जवेद खान लष्क २९ का प्रमुख हेने के नाते मेल भेज रहा हूं... हमारा एकही मक्सद है, पुरे हिंदूस्थान मे जिहाद का पालन हो... तभी हमारा देश प्रगती करेगा.

’या आशयाचा मजकूर लिहिला होता. हा मेल पाहताच त्यांनी शिक्षिकेने या घटनेची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकेस दिल्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मेलमध्ये डोंबिवलीतील काही नागरिकांची नावे लिहीली आहेत. याप्रकरणाचा तपास ठाणे नगर पोलिस ठाणे करत असून त्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात असल्याची माहिती उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.

बडी प्रॉब्लम यहा की एज्युकेशन सिस्टम है...

या मेलमध्ये सध्याच्या शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मदरसा आणि जिहाद विषयी लिहिले आहे. यात असे लिहिले आहे की, लष्कर २९ मे कई मुजाहिद सदस्य है, जो हर घर मे जिहाद पहुँचाना चाहते है.. लष्कर २९ जिहाद को मानने वाली हिंदुओ की संघटना है.. धमाका- बिना धमाके के लोगो को समझ नही आती. हिंदुस्थान मे जिहाद पालन करने मे सबसे बडी प्रॉब्लम यहा की एज्युकेशन सिस्टम है.. यहा की एज्युकेशन सिस्टम बंद करके सिर्फ मदरसा द्वारा शिक्षा देनी चाहिए. तभी जिहाद के बारे मे पुरी जानकारी मिलेगी. हम मुंबई के स्कुल और कॉलेज मे धमाके करेंगे. असं या मेलमध्ये म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाला मोदी सरकारची मंजुरी

Latest Marathi News Live Update : लातूरमध्ये काँग्रेसला खिंडार, मनपाच्या माजी बांधकाम सभापतींचा भाजपात प्रवेश

पत्नीमुळे उदय सामंत आले अडचणीत? बालनाट्य स्पर्धेमध्ये राजकीय दबाव, काय आहे नवा वाद

Crime: 'तो' ॲसिड हल्ला बनावट! मुलीनेच केला होता बनाव; फोनमध्ये आढळले अश्लील फोटो, व्हिडीओ

'मन प्रसन्न तर चेहरा खुलून दिसतो'! स्मिता शेवाळेचा सकारात्मक दृष्टिकोन अन् डार्क सर्कल्सवर नैसर्गिक उपाय!

SCROLL FOR NEXT