Thane Rain sakal
मुंबई

Thane Rain: तानसा नदीला पूर, वज्रेश्वरीची गरम पाण्याची कुंड बुडाली

Ambadi News: तर काही घरामधे पुराचे पाणी शिरले आहे या भागात पावसाची संतत धार सुरु आहे.

सकाळ वृत्तसेवा

दीपक हिरे

Vajreshwari: भिवंडी तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणुन परिचित असलेल्या व गरम पाण्याची कुण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्लोली कुंड येथे तानसा नदीला पुर आला असल्याने येथील जन जीवन विस्कळीत झाले आहे तसेच गरम पाण्याची नदीतील काही कुंड पाण्याखाली बुडाली आहेत

काल रात्री पासून होत असलेल्या अतिवृष्टि पावसामुळे गणेशपुरी वज्रेश्वरी अक्लोली अम्बाडी या परिसराला पावसाने पूर्ण झोडपाले असून येथील नदी नाले खाच ख़ळगे तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे येथील तिन्ही गावा जवळून जाणाऱ्या तान्सा नदीस पुर आला आहे त्यामुळे येथील जन जीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीत शेतकऱ्याने आधीच उशिरा लावलेले भात रोपे मोठ्या प्रमाणात बुडाल्याने त्यांच्यावर भतपिकाचे संकट ओढवले आहे. तर नदी किनाऱ्या लगत अक्लोली कुण्ड येथे गरम पाण्याची कुंड बुडली आहेत तर काही घरामधे पुराचे पाणी शिरले आहे या भागात पावसाची संतत धार सुरु आहे

आज पहाटे पासून या भागात जोरदार पाऊस असल्या ने काही नागरिकानी घरीच राहणे पसंद केले मुसळधार पावसा मुळे येथील अंबाडी नाका परिसरात व जवळ झिडके ग्रामपंचायत च्याअर्ध वट असलेल्या गटारी काम व बेजबाबदार पणा मुळे रस्ता वर व पुलाखाली पाणी गेल्याने येथील जेष्ठ नागरिक विज य गा य क वा ड यांच्या घरा भोवती पाणी साचले. तसेच येथील अंबाडी वाडा मार्ग वाहतुकी वर परिणाम झाला आहे तर् रसत्यातील खड्डे मुळे काही वाहन ना किरकोळ अपघात होत असून जड वाहन नादृस्त होत आहेत .

दरम्यान या पावसाचा फटका येथील जवळची गोराड निंबवली अवचित् पाडा यांना देखील बसल्याने येथील जनजीवन विसकळीत झाले आहे येथील तानसा नदीकिनारी असलेली प्रसिद्ध औषधी गुणधर्म असलेले सात गरम पाण्याची कुंडे या पुराच्या पाण्याखाली गेली आहेत.या सातही कुंडावरून पुराचे पाणी वाहत आहे.दरम्यान पावसाळ्यात या ठिकाणी शनिवार रविवारी मोठया प्रमाणात भाविक पर्यटक वरून पाऊस पडत असताना गरम पाण्यात आंघोळ करण्यासाठी येत असतात.

या कुंडांवरून पाणी जात असल्याने पर्यटकांनी या ठिकाणी येऊ नये असे आवाहन गणेशपुरी पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.यावेळी गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक संतोष बोराटे यांनी अकलोली येथील कुंड आणि नदी किनाऱ्यावर असलेल्या भागांमध्ये भेट देऊन पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

Telegram Ban India : NEET परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरू

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय! विहिरीत उडी मारून केला निषेध

Neeraj Chopra: दुखापतीनंतर नीरज चोप्रा थेट 'या' मोठ्या स्पर्धेतून मैदानात उतरणार! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निवडीबाबत मोठी अपडेट

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

SCROLL FOR NEXT