ठाणे शहरातील मुख्य रस्त्यावर पसरलेली खडी. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे शहरातील मुख्य रस्त्यावर पसरलेली खडी. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे) 
मुंबई

ठाण्यातील रस्त्यांची धूळधाण!

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वापरलेल्या खडी आणि सिमेंटसदृश्‍य मातीच्या मिश्रणामुळे महामार्गावरील रस्त्यांवर जागोजागी धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सोमवारी रस्त्यावरील या खडीमुळे दोघे छायाचित्रकार दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, रस्त्यावरून धूळ उडवत जाणाऱ्या वाहनांमुळे वातावरणातही धुलिकण पसरत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या श्‍वसनक्रियेवर होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. 

ठाण्यातील पूर्वद्रुतगती महामार्गावरील उड्डाणपूल, कोपरी पूल ते घोडबंदर रोडवर धुळीचे साम्राज्य आहे. सद्यस्थितीत बहुतांश वाहने वातानुकूलित असल्याने विशेषतः या धुळीचा त्रास दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांनाच होत आहे. यंदा पावसाने तुफानी बॅटिंग केल्याने शहरातील रस्त्यांवर अगणित खड्डे पडून नागरिकांना गणेशोत्सव सणसुद्धा खड्ड्यांच्या त्रासात उरकावा लागला; तर शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पसरण्यात आलेल्या खडी व मातीमुळे रस्त्यांच्या धुळधाणीत भरच पडली आहे.

पूर्वद्रुतगती महामार्गावरील उड्डाणपूल आणि कोपरी पूल ते घोडबंदर रोड, मुंबई-नाशिक महामार्ग, ठाणे-बेलापूर रोड, मुंब्रा बायपास रोड आदी सर्वच रस्त्यांवर खडी व धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने वाहने हाकताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

परिणामी, वाहनांचा वेग मंदावून कोंडीत भर पडत आहे. वातावरणात धुळीचे कण मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने समोरील वाहनांचा अंदाज येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसमधील प्रवासी आणि दुचाकीस्वारांना बसत आहे. 

माती, खडीऐवजी हॉटमिक्‍सचा वापर
पूर्वद्रुतगती महामार्गावरील रस्ता व उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारित येत असल्याने खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना कळवले आहे. त्यानुसार, आता माती व खडीऐवजी हॉटमिक्‍सचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती दोन्ही प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण विभागाकडून शहरातील धुलिकणांची आणि हवेतील प्रदूषकांची नोंद केली जाते. रस्त्यावरील धुळीसंदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात येईल. तसेच, शहरात सुरू असलेल्या बांधकामांसाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण करणाऱ्या वाहनांसाठी नियमावली करून त्याबाबत पालिकेच्या अभियांत्रिकी विभागासह प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनाही कळवण्यात येईल.
- मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, ठाणे पालिका

पावसाने उघडीप दिल्याने वातावरणात उष्मा जाणवत आहे. त्यातच रस्त्यांवर खडी आणि धुळीचे साम्राज्य पसरल्याने उकाड्यासह धुळीचा सामना करावा लागत आहे. भरधाव वाहने हाकणाऱ्या महाभागांमुळे तर पादचाऱ्यांच्या नाकातोंडात धूळ जाऊन खोकल्याची उबळ येते. एखाद्या अवजड वाहनाच्या मागे असलेल्या दुचाकीस्वारालाही धुलिकणांचा मोठा त्रास होतो. या धुलिकणांमुळे कपडे मळण्यासह श्‍वसनाचे त्रास जाणवत आहेत.
- सुभाष परब, नागरिक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT