mansukh-hiren.jpeg 
मुंबई

मोठी बातमी - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात ATS ला मोठा झटका

दीनानाथ परब

ठाणे - ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवा, असे आदेश ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने महाराष्ट्र एटीएसला दिले आहेत. तपास थांबवून हत्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे विनाविलंब एनआयएकडे सोपवण्यात यावीत, असेही कोर्टाने आदेशात स्पष्ट केले आहे.

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपासही केंद्र सरकारने एनआयएकडे दिला आहे. तशी अधिसूचना यापूर्वीच काढण्यात आली आहे, तरीही एटीएसने तपास सुरू ठेवला आहे आणि आरोपींची कोठडीही मिळवली आहे. तपास तात्काळ थांबवून कागदपत्रे आमच्याकडे देण्याचा आदेश द्यावा', असा विनंतीचा अर्ज एनआयएतर्फे करण्यात आला होता. त्यावर कोर्टाने हा आदेश दिला. 

मनसुख हिरेन खुनाचा शोध निर्णायक टप्प्यावर आला असल्याने आता हा तपास एनआयएकडे सोपवण्याची गरज काय, असा प्रश्न दहशतवाद प्रतिबंधक दलाने म्हणजेच ATS ने केला होता. तपास यंत्रणातील दोन वेगवेगळ्या संस्था समान विषयावर तपास करत असल्या तरी त्या केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यास संघर्षाचे आयाम येण्याची शक्यता निर्माण झाली होती. दोन्ही यंत्रणा  वेगवेगळ्या किंबहुना परस्परांच्या  विरोधातील पक्षांच्या अखत्यारीत येत असल्याने येणाऱ्या काही दिवसात तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

Pune : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा भीषण अपघात, फॉर्च्युनरची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

'बालिका वधू'च्या गहनाने १० रुपयांच्या वस्तूपासून बनवला ब्रँड; कमावतेय कोट्यवधी, तुमच्याही घरात असेलच, काय आहे ती वस्तू?

SCROLL FOR NEXT