mango bottle 
मुंबई

Mango : वातावरणाचा आमरसाला फटका! घाऊक दरात प्रतिकिलो ६० ते ७० रुपयांनी वाढीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

वाशीः वातावरणातील बदलांमुळे यंदा हापूस आंब्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे हापूसचे दर वाढले असल्याने आमरसाचे घाऊक दरदेखील वाढले आहेत. घाऊक बाजारात ३ किलोच्या आमरसांसाठी ६०० रुपये मोजावे लागत असून प्रतिकिलोला हा दर ६० ते ७० रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हापूसच्या हंगामात प्रक्रिया उद्योगासाठी कॅनिंग प्रक्रिया व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. यासाठी थेट बागायतदारांच्या बागेतूनच आंबा गोळा केला जातो. यंदा हापूसचे उत्पादन दरवर्षीच्या तुलनेने कमी असल्याने सुरुवातीपासूनच आंब्याचे बाजारातील दर स्थिर आहेत. पहिला हंगाम आटोपला असून दुसऱ्या टप्प्यातील आंब्याच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. अशातच सध्या बाजारात कमी प्रमाणात आंबा दाखल होत असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अन्न प्रक्रिया दरांवरही त्याचा मोठा परिणाम झालेला आहे.

अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन

आमरसाला देश-विदेशात मोठी मागणी आहे. पातळीवर मोठ्या प्रमाणावर छोटे-मोठे प्रक्रिया उद्योग असून त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. कॅनिंगचा आंबा खरेदी दर सध्या प्रतिकिलो ६५ ते ७० रुपये आहे. गतवर्षी हा दर ३७ ते ४० रुपये होता.

'आंबा उत्पादन कमी असल्यामुळे कॅनिंगचे दर वधारले आहेत. परिणामी, आमरस, लोणची, पल्प, वडी, जाम आदी विविध उत्पादनांच्या दरात वाढ अपेक्षित आहे.'

- रामेश्वर बापट, आंबा प्रक्रिया व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Mira Bhayandar Morcha : 'परप्रांतीयांनी मोर्चा काढला, त्यांचा हेतू वाईट नव्हता, पण मनसेचा..'; आमदार मेहतांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता!

Latest Maharashtra News Updates : "लाज असल्यास मंत्रीपदाचा राजीनामा द्या" - राजन विचारे

Pimple Gurav News : निम्मे सीसीटीव्ही कॅमेरे ‘दृष्टीहीन’ देखभालीचा अभाव; सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमधील सुरक्षा ऐरणीवर

Yash Dayal: यश दयालच्या विरोधात FIR दाखल, होऊ शकते १० वर्षांची शिक्षा! तक्रार करणाऱ्या महिलेने पुरावेही केले सादर

Kolhapur Accident : साहिलवर होती कुटुंबाची जबाबदारी, कुरिअर सेवेनंतर विकायचा बिर्याणी; पार्सल देऊन लवकर येतो म्हणून गेला अन्...

SCROLL FOR NEXT