Kangana Ranaut sakal
मुंबई

Kangana Ranaut: कंगनाला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार; याचिका फेटाळली

अब्रुनुकसानीच्या खटल्याला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली ; Kangana also filed a counter-complaint against Javed Akhtar alleging criminal conspiracy, extortion and other charges.

सकाळ वृत्तसेवा

गीतकार जावेद अख्तर यांनी कनिष्ठ न्यायालयात आपल्या विरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याला स्थगिती द्या अशी विनंती करत उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या अभिनेत्री कंगना राणावत हिला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. कंगनाची मागणी सद्यस्थितीत मान्य करता येणार नाही असे स्पष्ट करत न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी कंगनाची याचिका फेटाळून लावली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने गीतकार जावेद अख्तर यांचा उल्लेख रिपब्लिक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला होता. गीतकार जावेद अख्तर यांनी याप्रकरणी कंगना विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला. कंगनाने सुद्धा जावेद अख्तर यांच्या विरोधात गुन्हेगारी कट, खंडणी व इतर आरोप करत विरोधी तक्रार दाखल केली.

अंधेरी कोर्टाने जावेद अख्तर यांच्यावरील खंडणीचा आरोप रद्द केला व इतर आरोपांप्रकरणी अख्तर यांना २४ जुलै २०२३ मध्ये समन्स बजावले.

अख्तर यांनी या समन्स विरोधात दिंडोशी न्यायालयात धाव घेतली दिंडोशी सत्र न्यायालयाने अख्तर यांच्या अर्जावर अंतिम सुनावणी होईपर्यंत राणावतच्या तक्रारीवरून न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली ही स्थगिती उठल्यानंतर कंगना विरोधात दाखल केलेल्या खटल्यावर पुन्हा सुनावणी होणार असल्याने कंगनाने उच्च न्यायालयात या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत ऍड रिझवान सिद्दीकी यांच्या मार्फत याचिका दाखल केली.

या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्याने न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी हा निकाल आज जाहीर करत कंगनाची अब्रुनुकसानीच्या खटल्याला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT