sakal
मुंबई

Bhiwandi News: भिवंडीत मनपा उभारणार शिवरायांचा भव्य पुतळा; बजेटमध्ये विषेश तरतुद

Chinmay Jagtap

Bhivandi News: कोणतीही करदरवाढ नसलेला २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी भिवंडी पालिकेचा ९४२ कोटी ४९ लाख २६ रुपयांचे अंदाजपत्रक आणि वर्षअखेर २ कोटी ५२ लाख २८ शिलकी अर्थसंकल्प मंजूर केले आहे.

या अर्थसंकल्पातून नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सेवा पुरवणे यावर विशेष भर दिल्याचा दावा पालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांनी केला आहे. मागील अर्थसंकल्पातील पूर्ण केलेल्या कामांचा आढावा न घेता केवळ त्यांनी केलेल्या कामांची माहिती यावेळी दिली.(Bhiwandi News)

भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या २०२३-२४ चे सुधारित अंदाजपत्रक ७९६ कोटी ३५ लाख १७ हजार मात्र तयार करण्यात आले आहे. तसेच वित्तीय वर्ष २०२४-२५ मध्ये महापालिकेचे प्रारंभिक शिल्लक १६१ कोटी ९७ लाख ९३ हजार अपेक्षित आहे.

असे एकूण उत्पन्न प्रारंभिक शिलकीसह ९४२ कोटी ४९ लाख २६ हजार रुपये अपेक्षित धरण्यात आलेले आहेत. या वर्ष अखेर २ कोटी ५२ लाख २८ हजार शिलकीचा अर्थसंकल्प मुख्य लेखा वित्त अधिकारी किरण तायडे यांनी पालिका प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांना सादर केला.

या वेळी पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे, विठ्ठल डाके, उपायुक्त मुख्यालय दीपक झिंजाड, उपायुक्त प्रणाली घोंगे, मुख्य लेखापरीक्षक मयूर हिंगाणे, शहर अभियंता सुरेश भट उपस्थित होते. या वेळी प्रशासकीय समिती सदस्यांमध्ये चर्चा होऊन अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.(Revised Budget 2023-24 of Bhiwandi-Nizampur City Municipal Corporation)

या वर्षी कोणतीही करवाढ नसलेले अर्थसंकल्प आहे. भिवंडी शहर आजूबाजूच्या परिसराला लागणार्‍या आगी लक्षात घेता अग्निशमन विभागासाठी नवीन तीन फायर फायटिंग बाईक, दोन मिनी फायर इंजिन टेंडर, साधन सामग्री खरेदी करण्यात आली.

पाणीपुरवठा विभागासाठी चार टँकर खरेदी करण्यात आले. आरोग्य विभागासाठी तीन जेसीबी घेतल्या आहेत. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत हॉस्पिटल भाजप इमारतीचे बांधकाम अंतिम टप्‍प्यात आहे. तर चार नागरी आरोग्य केंद्र बांधण्यात आल्याचे यावेळी आयुक्तांनी नमूद केले. दिव्यांग लाभार्थींना शैक्षणिक साहित्य उपकरण उपक्रम उपलब्ध करून दिले असून दोन लाभार्थ्यांना सहायक उपकरणे खरेदीसाठी अनुदानही देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

अर्थसंकल्पात विशेष करून

* मलनि:सारण प्रकल्पासाठी चार एसटीपी प्लांटपैकी एक कार्यान्वित केला आहे. उर्वरित तीन कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे.

* शहरात अजयनगर स्मशानभूमीमध्ये एका गॅसवाहिनीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

* महापालिकेचा ५० खाटांचा बीजेपी दवाखाना सुरू करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे.

* शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणे व परिसर सुशोभीकरण करण्यासाठी सरकारकडून तीन कोटीचे अनुदान. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे आणि आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

* मालमत्ता उत्पन्नवाढीसाठी सर्व मालमत्तांचा जीआयएस मॅपिंग सर्व्हे करण्यात येणार आहे. यामधून सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करून सुधारीत करआकारणी करणे आणि महसूल उत्पन्न वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.

नगरोत्थान अभियांतर्गत तरतूद

नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविणेअंतर्गत सात कोटी व नगरोत्थानकरता नऊ कोटी महापालिकेचा हिस्सा अशी तरतूद करण्यात आली आहे. शहरातील एकूण २० किलोमीटर लांबीचे ८२ सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधणे, महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान अभियांतर्गत सरकारी निधीतून तयार करण्याचे प्रस्तावित आहे. महापालिका शाळा इमारती बळकटीकरण करणे व बँचेस पुरवण्यासाठी दीड कोटी तरतूद ठेवली आहे. एकात्मिक पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक १ अ योजनेअंतर्गत बांधलेल्या १६ पाण्याच्या टाक्यांपैकी दोन टाक्या वापरात आहेत. लवकरच पाच टाक्यांच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT