Railway News sakal
मुंबई

Railway News: महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेचा महत्वाचा निर्णय; २१ प्रश्नांचे सर्व्हेक्षण

सकाळ वृत्तसेवा

Railway News:

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी दर चार महिन्यांनी आढावा घेण्याचा निर्णय रेल्वे पोलिस महासंचालकांनी घेतला आहे.

याचाच एक भाग म्हणून महिला प्रवाशांसाठी २१ प्रश्‍नांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. रेल्वे प्रवासात महिला प्रवाशांना सुरक्षे संदर्भातील भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेण्यात येणार आहे. ज्यामुळे लोहमार्ग पोलिसांना महिला प्रवासी सहभागातून सुरक्षा भक्कम करता येणे आणखी सोयीचे होणार आहे.

उपनगरी रेल्वे ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. दिवसाला ७५ लाख लोक उपनगरी लोकलने प्रवास करतात. यात साधारण २५ लाखांपेक्षा जास्त महिला प्रवाशांची संख्या आहे.

विशेष म्हणजे, उपनगरी रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांची संख्या ज्या पटीने वाढत आहे, तेवढाच महिलांचा लोकल प्रवासाचा सुरक्षेचा मुद्दा समोर आलेला आहे.

पहाटेच्या पहिल्या लोकलपासून रात्रीच्या शेवटच्या लोकलपर्यंत ट्रेनच्या महिला डब्यातून महिला प्रवाशांचा रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, याकरिता लोहमार्ग पोलिस सतत प्रयत्न करत आहे.

यापुढे जात महिला प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षिततेमध्ये कोणत्या बाबींचा समावेश व्हावा आणि महिलांच्या शिफारशी, त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी गुगल फॉर्मच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत सर्वेक्षण सुरू राहणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांत गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

SCROLL FOR NEXT